पंचायती राज संस्थांच्या निवडून आलेल्या महिला प्रतिनिधींची (WERs) राष्ट्रीय कार्यशाळा आज नवी दिल्ली येथे पंचायती राज मंत्रालय मार्फत आयोजित करण्यात आली होती, ज्यामध्ये “सशक्त पंचायत-नेत्री अभियान” सुरू करण्यात आले. यावेळी केंद्रीय पंचायती राज मंत्री श्री राजीव रंजन सिंह उर्फ लालन सिंह, केंद्रीय महिला व बाल विकास मंत्री श्रीमती अन्नपूर्णा देवी, केंद्रीय राज्यमंत्री पंचायती राज प्रा.एस.पी.सिंह बघेल यांच्यासह केंद्रीय राज्यमंत्री (युवक कार्य आणि क्रीडा) श्रीमती रक्षाताई खडसे यांचाही सहभाग होता.

‘सशक्त पंचायत-नेत्री अभियान’ या उपक्रमाच्या उद्घाटनाचा भाग होण्याचा केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांना सन्मान मिळाल्या बद्दल त्यांनी पंचायती राज मंत्रालय चे आभार मानून, पंचायती राज ही सर्वसमावेशक विकासाची पायरी असून, महिलांना शिकण्याची, प्रगतीची आणि राष्ट्राच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावण्याची संधी मिळावी यासाठी आपण सर्वजण मिळून प्रयत्न करूया असे उपस्थितांना आवाहन केले. तसेच १९९२ साली झालेली ७३ वी घटनादुरुस्ती हे भारताच्या इतिहासातील एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरले. याद्वारे ‘नारीशक्ती’ सक्षम झाली आणि भविष्यातील पिढ्यांसाठी उज्ज्वल वाट निर्माण असून, सशक्त पंचायत-नेत्री अभियान हे पंचायती राज संस्थांना बळकटी देण्यासाठीचे पुढचे मोठे पाऊल ठरणार असल्याबाबत केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी आपले मत व्यक्त केले.


