पाल येथील हरीण पैदास केंद्रात चौदा सांबर हरीणाचा मृत्यूवन्यजीव वनविभागाचे दुर्लक्ष : आणखी काही हरणांची प्रकृती चिंताजनक


पाल ता. रावेर

पाल येथील हरीण पैदास केंद्रातील हरिणाची योग्य देखरेख केली जात नसल्याने मागील आठवडा भरात येथील हरीण पैदास केंद्रातील वेळेवर पुरेसा चारा पाणी न मिळाल्याने चौदा सांबर हरीण मरण पावल्याचे माहिती समोर आली आहे. आणखी काही हरिणाची प्रकृती चिंताजन आहे. या हरीण पैदास केंद्रातील हरीण मरत असल्याची माहिती वनविभागातर्फे लपविण्यात येत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

विशेष म्हणजे याबाबत वन्यजीव वनविभागातून माहिती देण्यास टाळाटाळ होत असून हरीण पैदास केंद्रातील सांबर जातीच्या हरीण कडे वन्यजीव वनविभाग दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे. हे हरीण पैदास केंद्र हरीणाचीं पैदास करून हरिणाची संख्या वाढविण्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात आले होते. मात्र या ठिकाणी उलटे चित्र दिसत असून हरिणाची संख्या वाढविण्याऐवजी संख्या घटत आहे. अश्यात मागील आठवड्यात जवळपास चौदा हरीण मरण पावले आहेत. त्यामुळे वनविभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

विकासाच्या नावाने बोंबाबोंब

पाल पर्यटन केंद्र हे देशभरातील पर्यटकाचे आकर्षणाचे केंद्र आहे. त्या दृष्टीने हजारो पर्यटक पाल येथे भेट देतात. या दरम्यान हरीण पैदास केंद्राला सुद्धा भेट देतात. मात्र वन्यजीव वनविभागाच्या दुर्लक्षित कारभाराने या केंद्रातील हरीण नामशेष होताना दिसत आहेत. एकीकडे जंगल सफारीच्या नावाखाली विकास कामाच्या नावावर लाखो-करोडो रुपये खर्च करून मोठी जाहीरात केली जात आहे. मात्र या ठिकाणी हरीण पैदास केंद्रातील हरिणाना वेळेवर चारा देण्यासाठी वन्यजीव वनविभागाकडे निधी नाही आणि वेळही नाही. विकासाच्या नावाने बोंबाबोंब असून या निधीचे पुढे काय होते हा प्रश्न अनुत्तरीत आहे.

आठ दिवसात १४ हरीण दगावले

वन्यजीव संरक्षणासाठी मोठे कायदे तयार करण्यात आले आहेत. मात्र या ठिकाणी निरपराध प्राण्यांचा वनविभागाच्या हलगर्जीपणा व वनविभागाच्या बेजबाबदार अधिकाऱ्याच्या दुर्लक्षामुळे आठच दिवसात चौदा हरीण मरण पावले. याची सखोल चौकशी करण्यात यावे अशी मागणी पर्यटकांकडून केली जात आहे. मागील काही वर्षापूर्वी बारा हरीण मरण पावले होते. त्यानंतरही वनविभागाला जाग आली नाही. कोणतीही उपाय योजना करण्यात आली नाही. आता या हरीण पैदास केंद्रात फक्त सहा हरीण उरले आहेत. त्यातीलही काही हरिणाची प्रकृती चिंता जनक आहे. असे जर होत राहिले तर हरिणाची संख्या इतक्या वर्षापासून संख्या वाढण्याऐवजी दिवसेंदिवस हरिणाची संख्या घटत आहे. तसेच वर्षभरात सांबर हरिण यांच्या वैद्यकीय पाहणी उपचार केली जात नाही. परंतु हरणाचा मृत्यू झाल्याने सध्या व्हेटरनरी डॉक्टरला बोलवून या प्राण्यांची वैद्यकीय तपासणी केली जात आहे.

हरीण पैदास केंद्रातील मरण पावलेल्या हरीण बाबत माहिती वन्यजीव कार्यालयाला विचारणा केली असता वनक्षेत्रपाल अमोल चव्हाण यांनी पदभार सोडला तेव्हा डिसेंबर महिन्यात 21 हरीण होते. येथील मृत हरिणाच्या शवविच्छेदन करून त्यांचे नमुने वैद्य शाळा पुणे येथे पाठविण्यात आले असून कशामुळे मरण पावले रिपोर्ट आल्यावर स्पष्ट होईल अशी माहिती वनपाल सूर्यवंशी यांनी दिली मात्र पण चारा पाणी मुळेच मरण पावल्याचे अंदाज आहे असे पशु. वैद्य यांचे म्हणेने आहे.

योग्य वेळेवर चारा पाणी व योग्य पोषण आहार वेळेवर दिला गेला नसल्याने हरिण अशक्त होऊन मरण पावल्याचे चर्चा आहे. जर जबाबदार अधिकारी अश्याप्रकारे कामात बेजबाबदर पणा करतात आणि त्यामुळे एवढ्याप्रमानावर हरीण मरण पावत आहे तर वरिष्ठ अधिकारी का लक्ष देत नाही असा प्रश्न उपस्तितीत केला जात आहे.

मृत हरणांचे शवविच्छेदन करून त्यांच्या शरीरातील नमुने पुणे येथील वैध शाळेत पाठविण्यात आले होते. चाऱ्यामध्ये विष बाधा होऊन हरीण मरण पावल्याचे रिपोर्ट आहे.

प्रदीप काळे

तालुका पशु विस्तार अधिकारी