दोन मुलांची आई प्रेमात पडली अन् व्हॅलेंटाईनला प्रियकरासोबत पळाली…! –

नवी दिल्ली – प्रेमाला वयाचे बंधन नसल्याचे म्हटले जाते मात्र लग्नानंतर दोन मुले झाल्यानंतर एका विवाहितेचा रील्स बनवण्याच्या नादात एका तरुणावर जीव जडला. व्हॅलेंटाईनच्या दिवशी दोघांनी घरातून पळ काढला. विवाहितेचा शोध घेत असताना तिचा ठावठिकाणा न लागल्याने पोलिसात याप्रकरणी हरवल्याची नोंद करण्यात आली. मध्य प्रदेशातील सागरमध्ये हा प्रकार समोर आला.

काय घडले नेमके
दोन मुलांची आई असलेल्या विवाहितेला इन्स्टाग्रामवर रील बनवण्याची खूप आवड होती. तिथे तिची एका तरुणाशी भेट झाली. काही दिवसांनी ही विवाहिता तरुणाच्या प्रेमात पडली व व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी ती तरुणासोबत पळून गेली.

बांद्रीचा रहिवासी असलेल्या विवाहितेच्या पतीने पोलीस स्टेशनमध्ये पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. पतीने पोलिसांना सांगितलं की, त्याची पत्नी इन्स्टाग्रामवर रील बनवायची. तिला प्रसिद्ध होण्याची आवड होती. आरोपी तरुणाने याचा फायदा घेतला आणि लखपती होण्याचं आमिष दाखवून तिच्याशी बोलू लागला.

13 फेब्रुवारी रोजी सकाळी विवाहिता तिच्या आठ आणि तीन वर्षांच्या मुलांसह जरुवाखेडा येथून निघाली. पतीने सांगितलं की, जेव्हा त्याने आपल्या पत्नीला समजावण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिने घरातून पळून जाण्याची धमकी देण्यास सुरुवात केली. त्या तरुणाने त्याला जीवे मारण्याची धमकीही दिली.

आता पत्नीचा मोबाईल बंद आहे. आरोपी तरुणाने पत्नीला इन्स्टाग्रामवरून लाखो रुपये कमवण्याचं आमिष दाखवलं होतं. तेव्हापासून त्याची पत्नी घरातून बेपत्ता आहे. पतीने बडोदिया कलान पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवली आहे. ‘लोकमत’ने याबाबत ऑनलाईन वृत्त दिले आहे.