निवृत्तीवेतन धारकांना हयातीचा दाखला न मागता पेन्शन करा: प्रा.धिरज पाटील; जगात कोरोना विषाणूने सर्वात जास्त जेष्ठांना घेरले, बाहेर पडू नका – आवाहन

भुसावळ (प्रतिनिधी )-
केंद्रीय तसेच राज्य शासकीय निवृत्तीवेतन आणि कुटुंब निवृत्तीवेतन धारकांना संचारबंदीच्या काळात हयातीचा दाखला मागू नये असावं आवाहन शिवसेनेचे तालुका संघटक प्रा.धिरज पाटील यांनी निवृत्त कर्मचाऱ्यांच्या वतीने केले आहे. 
हयातीचे दाखले मिळणे कठीणच
राज्य शासनातर्फे बायोमेट्रिक पद्धतीने हयातीचा दाखला घेण्याची सुविधा राज्यातील कोषागार, उपकोषागार, तसेच जिल्हाधिकारी कार्यालय, तहसीलदार कार्यालय, राष्ट्रीयकृत बँका येथे उपलब्ध करून देण्यात आली आहे पण संचारबंदी असतांना हे दाखले मिळणे कठीण आहे. आज दिनांक १ एप्रिल रोजी भुसावळ नगरपालिकेच्या काही निवृत्त कर्मचाऱ्यांनी आस्थापनेत जाऊन स्वाक्षरी केली आहे परंतु संचारबंदीच्या काळात सर्वांनाच पालिकेत जाणे शक्य नाही.
जेष्ठांच्या सुरक्षेसाठी शासनाच्या विभागांना पत्र: प्रा.धिरज पाटील
जगात कोरोना विषाणूने सर्वात जास्त जेष्ठांना घेरले असून काहींचा मृत्यूसुद्धा झाला आहे, अश्या परीस्थितीत जेष्ठांनी घरा बाहेर पडणे धोक्याचे ठरेल म्हणून  जेष्ठांनी घराबाहेर पडून नये तसेच महाराष्ट्र शासनाच्या शासकीय व निमशासकीय विभाग, नगरपालिका, महानगरपालिका, गृहविभाग, सामान्य प्रशासन विभाग, कृषीविभाग, शालेय शिक्षण आणि क्रिडा विभाग, नगर विकास विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, जलसंपदा विभाग, जिल्हा परिषद, अन्न, नागरी पुरवठा, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागा व इतर विभागाच्या सर्व आस्थापनांनी, पेन्शन देणाऱ्यांनी हयातीचे दाखले न घेता पेंशन द्यावी अशी मागणी  प्रा.धिरज पाटील यांनी केली आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *