वरणगाव : शहरासाठी 2021 मध्ये नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली असून योजनेचे काम संत गतीने सुरू असल्याने शहराला पाणीपुरवठ्यात अडचणी निर्माण होत आहेत. यामुळे दोन जलकुंभ तसेच सुरळीत पाणी पुरवठ्याच्या मागणीसाठी तीन तास जलसमाधी आंदोलन करण्यात आले. तर लेखी आश्वासनानंतर सदरचे आंदोलन मागे घेण्यात आले.

शहराची वाढती लोकसंख्या बघता आणि पुरवठा दहा ते पंधरा दिवसानंतर होत असून नवीन पुरवठा योजना मंजूर करण्यात आली आहे. मात्र, योजनेचे काम संथगतीने सुरु असल्याने शहरवासियांना पाणी टंचाईची झळ सहन करावी लागत आहे. यामुळे
सदरची योजना ही 15 फेब्रुवारीच्या आत आधुनिक पद्धतीने सुरू करावी यासाठी तापी नदी किनार्यावरील जॅकवेल जवळ माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांच्या मार्गदर्शनात जलसमाधी आंदोलन करण्यात आले .
नदीपात्रात जॅकवेल तयार करा
शहरातील नवीन पाणीपुरवठ्यासाठी नदीच्या किनार्यावर जॅकवल असल्याने पुरेसे पाणी उचल होत नाही. यामुळे पाणीटंचाईला सामोरे जावे लागते मंजूर आराखड्यानुसार नदीच्या पात्रामध्ये नवीन जॅकवेल तयार करावे यामुळे पाण्याची उचल होईल व पाणी टंचाई सुटेल. व शहराला दररोज पाणीपुरवठा करता येईल अशी मागणी यावेळी करण्यात आली तसेच पाणीपुरवठा योजनेतील विकास कॉलनी, प्रतिभा नगर व पवन नगर येथील जागेवर जलकुंभाचे काम सुरु करण्यात यावे अशीही मागणी करण्यात आली.
प्रस्ताव तातडीने जिल्हा प्रशासनाकडे दाखल करण्यात येईल
जलकुंभाचे काम त्वरित सुरू करण्यात येईल तसेच कठोरा येथील तापी नदी पात्रात नवीन जॅकवेल व इंटॅक्टवेल मंजूर करण्याचा प्रस्ताव तातडीने जिल्हा प्रशासनाकडे दाखल करण्यात येईल. अशा प्रकारचे लेखी आश्वासन मुख्याधिकारी सचिन राऊत व पाणीपुरवठा अभियंता जनार्दन पवार, मुक्तार खान, दीपक काळे यांनी दिले.
आंदोलनात यांची होती उपस्थिती
नगराध्यक्ष सुनील काळे यांच्या नेतृत्वात उपनगराध्यक्ष शेख अखलाक, जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद भैसे, कामगार नेते मिलिंद मेढे, तालुका उपाध्यक्ष शामराव धनगर, डॉ सादिक शेख, मुस्लिम अन्सारी, हाजी कदिर शेठ, नाना चौधरी, योगेश माळी, सुभाष माळी, युवा मोर्चा शहराध्यक्ष आकाश निमकर, तुकाराम कोळी, नामदेव सोनवणे, अजमल खान,फजल शेख ,संदीप माळी,मयूर शेळके,भोजराज पालवे, राजू धोबी,अमृत लाला मुरारी,भगवान धनगर,अंबादास चौधरी,तालुका उपाध्यक्ष किरण धुंदे,राहुल जंजाळे,दशरथ गोसावी ,विशाल चौधरी,भाऊलाल टिंटोरे,सोनू शेख, मनीष भंगाळे,संतोष रॉक ,अनिल कोळी ,किरण भिल,राहुल धूंदे,नरेंद्र बावणे,सागर कोळी,अनिल काळे,नाना चांदणे आदी उपस्थित होते .


