तापी नदीवरील संरक्षण जाळ्यांच्या प्रस्तावास तत्काळ मंजुरी द्या –शिशिर जावळे. – अन्यथा उपोषणास बसण्याचा इशारा..

.

भुसावळ -भुसावळ जिल्हा जळगाव येथील तापी नदीवर भव्य मोठा पूल असून त्या पूलावर दोन ते तीन फुटाचे कठडे लावण्यात आलेले आहे. या पुलावर प्रचंड रहदारी असते तसेच या पुलावर मॉर्निंग वॉक साठी तसेच संध्याकाळी सुद्धा शतपावली करण्यासाठी अबाल वृद्ध सगळेच या पूलावर फिरत असतात . या पुलावरील कठड्यांजवळ युवक युवती नागरिक कित्येक वेळा एक एक दोन दोन तास एकाच ठिकाणी उभे राहून गप्पा मारताना हिंडताना दिसतात तसेच सेल्फी सुद्धा काढतात. आणि या पुलावरील या लहानशा कठड्यांमुळे आजपर्यंत सातत्याने अनेकांनी तापी नदीमध्ये उडी मारून आत्महत्या केल्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहे .त्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. दिनांक 13 जानेवारी ते दिनांक 15 जानेवारी 2025 दरम्यान एका महिलेने तापी नदीच्या पुलावरून उडी घेतली आणि एका व्यक्तीने उडी मारून आत्महत्या केली. त्यामुळे तापी नदीवर संरक्षण जाळ्या नसल्यामुळे आत्महत्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे .तसेच बऱ्याचदा या पुलावरअपघात सुद्धा होतात. त्यातल्या त्यात नुकतीच आता शेळगाव बॅरेज पूर्ण झाल्यामुळे त्याचा बॅकवॉटर मुळे तापी नदीत पाण्याची पातळी वाढलेली आहे. त्यामुळे अनेकदा आत्महत्या करणाऱ्यांना उडी मारणाऱ्यांना जीव वाचवण्यासाठी वेळ मिळत नाही. म्हणून तापी नदीवरील पुलावरून आत्महत्या रोखण्यासाठी त्वरित युद्ध पातळीवर तापी नदीच्या पुलावरील दोघं बाजूंच्या कठड्यांजवळ किमान बारा फूट उंचीचे सुरक्षा जाळ्या भराव्यात . जेणेकरून त्या ठिकाणी होणाऱ्या आत्महत्या रोखण्यास आपणास मदत होईल. जे समाज हितासाठी अत्यंत आवश्यक आहे. सदर सुरक्षा जाळ्या मध्ये सुशोभीकरणासाठी आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी विविध शोभिवंत फुलांच्या, झाडांच्या कुंड्या यांची व्यवस्था सुद्धा व्हावी. अशा आशयाचे निवेदन सामाजिक कार्यकर्ते शिशिर जावळे यांनी मुख्यमंत्री कार्यालया सह सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संबंधित सर्व कार्यालयांना हे निवेदन गेल्या 3महिन्यांपासून पाठवलेल आहे. यावर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सदर तापी नदीवरील दोन्ही बाजूकडील बारा फुटाच्या संरक्षण जाळ्या चा अंदाजपत्रकाचा प्रस्ताव वरिष्ठ स्तरावर शासनाकडे पाठविण्यात आले असल्याच शिशिर गावडे यांना कळविण्यात आलेले आहे.मात्र अद्यापही त्या अंदाजपत्रकावर शासनाने कुठलाही ही ठोस निर्णय घेतलेला नाहीये . एकीकडे भुसावळतील तापी नदीच्या पुलावरून पउडी घेऊन आत्महत्या करणाऱ्यांचे प्रमाण दररोज वाढत आहे त्यामुळे तातडीने युद्ध पातळीवर तापी नदीवरील दोन्ही कठड्यांच्या पुलावर बारा फुटांच्या संरक्षण जाळ्यांसह त्यावर बॉटनिकल गार्डन वगैरे संदर्भात चा प्रलंबित अंदाज पत्रकास त्वरित मंजूरी द्यावी अन्यथा या विरुद्ध तापी नदी पुलावर आमरण उपोषणास बसणार असल्याचे पत्र त्यांनी मा. मुख्यमंत्री , मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य यांचे सह सार्वजनिक बांधकाम विभागासह जिल्हाधिकारी जळगाव यांना पत्र पाठविलेअसल्याचे त्यांनी एका प्रसिद्धी पत्रकांद्वारे कळविलेले आहे