भुसावळ- नगरपरिषद संचलित म्युनिसिपल हायस्कूल भुसावळ येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी शाळेचे मुख्याध्यापक एस जी मेढे होते. शाळेतील युक्ती मिश्रा तिच्यासह विविध विद्यार्थिनींनी क्रांतीचे सावित्रीबाईच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केले.

सदर प्रसंगी शाळेच्या सेवा ज्येष्ठ शिक्षिका सरला सावकारे, शालिनी बनसोडे, डॉ . प्रदीप साखरे यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होत्या. सर्वांनी क्रांति ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष अर्पण करून अभिवादन केले. प्रथम विद्यार्थ्यांची भाषणे झाली . शाळेचीं विद्यार्थिनी युक्ता हीने आपल्या भाषणात विद्यार्थिनींना शिक्षण का घ्यायला पाहिजे आणि शाळेत का यायला पाहिजे हे स्पष्ट केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष व शाळेचे मुख्याध्यापक एस जी मेढे यांनी अठराव्या शतकात सावित्रीबाईंनी शिक्षणाची ज्ञानगंगा आपल्यापर्यंत कशी आणली व आपण त्या शिक्षणाचे फळे कशी चाखत आहोत व त्यासाठी सावित्रीबाईंना किती कष्ट ,यातना सहन कराव्या लागल्या , हे स्पष्ट केले. शाळेच्या सेवाजेष्ठ शिक्षिका श्रीमती सरला सावकारे यांनी माता सावित्रीच्या शैक्षणिक कार्याबद्दल विस्तृत विवेचन करून अभिवादन केले. डॉ. प्रदीप साखरे यांनी माता सावित्री नसत्या तर आज स्त्रियांना शिक्षणाचा हक्क मिळालाच नसता हे सविस्तर स्पष्ट केले. शालिनी बनसोडे यांनी सर्वप्रथम शाळा उघडली तेव्हा सावित्रीबाईंना किती त्रास सहन करावा लागला हे उदाहरणे स्पष्ट करून दिले.व सावित्रीबाई जेव्हा शाळेत जायच्या व शिक्षिका म्हणून काम करायच्या तेव्हा समाजातील लोक किती त्रास देत होते याबद्दल अनेक उदाहरणे देऊन श्रीमती संध्या धांडेयांनी स्पष्ट केले.तसेच विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना रेखा सोनवणे म्हणाल्या, आज शिक्षण घेणे का गरजेचे आहे आणि मुलींनी शिक्षण का घ्यायला पाहिजे ही सावित्रीबाई फुले यांच्याकडून शिकावे एक सुशिक्षित स्त्री घराला व राष्ट्राला किती सुशिक्षित करू शकते हे त्यांनी स्पष्ट केले . श्रीमती ज्योती शिरतुरे भाषण देताना म्हणाल्या, माता सावित्रीबाई यांनी सर्वप्रथम आपल्या पतीकडून त शिक्षण घेतले व शिक्षणाच्या ओढीमुळे देशातील पहिल्या शिक्षिका होण्याचा मान त्यांना मिळाला , त्यांनी आपले पती महात्मा ज्योतिबा फुले यांचेकडून शिक्षण घेतले व त्या स्वतः शिक्षिका बनल्या. या साठी त्यांना प्रयत्न करावे लागले हे स्पष्ट केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रयत्न केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्रीमती संध्या धांडे यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थी विद्यार्थिनींना सर्व महीला शिक्षक शिक्षकेतरांकडून शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. व रौनक भराडीया यांच्याकडून लाडू वाटप करण्यात आले.



