भुसावळ ( प्रतिनिधी )
देशभरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता अनेकांनी आपल्या प्रवासाचे नियोजन रद्द केल्यामुळे एक्सप्रेस गाड्यांमधील कमी झालेली गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने सात एक्सप्रेस गाड्या दि. २० ते ३१ मार्च पर्यंत रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
रद्द करण्यात आलेल्या गाड्यांमध्ये अप भुसावळ पुणे हुतात्मा एक्सप्रेस.डाउन पुणे-भुसावळ हुतात्मा एक्सप्रेस. डाउन दादर जालना जनशताब्दी एक्सप्रेस. अप जालना दादर जनशताब्दी एक्सप्रेस , एलटीटी- काझीपेठ ताडोबा एक्सप्रेस. अप काझीपेठ – एलटीटी ताडोबा एक्सप्रेस तसेच ०२१९८ अप जबलपुर कोइम्बतुर विशेष गाडी दि. २१, २८ मार्च रोजी तर ०२१९७ डाउन कोइम्बतुर जबलपुर विशेष गाडी दि.२३ व ३० मार्च रोजी अशा सात एक्सप्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.



