भुसावळ – येथील बाजारपेठ पोलीस स्टेशनमधील बारा पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहे शहरातील सर्वात मोठी हद्द व संवेदशील पोलीस स्टेशन म्हणून ओळखले जाणारे बाजारपेठ स्टेशन आहे.या पोलीस स्टेशन हद्दीत घरफोडी,चोरी,जबरी चोरी, शस्त्र बाळगणे,मोबाईल चोरी,रस्ता लूट,दरोडे, खून तसेच महिलांची छेडखानी, अत्याचार, गुटखा ,तस्करी, गांजा,मोटरसायकल चोरी असे अनेक मोठ – मोठे गुन्हे घडलेले आहेत .

या पोलिस स्टेशन मध्ये कार्यरत 12 पोलीस कर्मचारी यांच्या नुकत्याच बदली झाली आहे यात पो कॉ नेव्हील बाटली यांची (भुसावळ शहर), यासीन पिंजारी (वरणगांव) समाधान पाटील (जी.वि.शा. भुसावळ) उमाकांत पाटील(एस.डी.पी.ओ. भुसावळ) दिपक पाटील( भुसावळ शहर) संदीप परदेशी (मुक्ताईनगर) रवींद्र साळुंखे(शहर वाहतुक शाखा भुसावळ) शशिकांत तायडे (शहर वाहतुक शाखा भुसावळ))अक्षय चव्हाण (जिल्ह्यापेठ जळगांव) मंदार महाजन (एमआयडीसी जळगांव) प्रशांत लाड (जिल्ह्यापेठ जळगांव) सुभाष साबळे (एमआयडीसी जळगांव) या पोलीस कर्मचाऱ्यांचा बदल्या झाल्या आहे .
या बदली झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचे काम उल्लेखनीय होते व आहे या कर्मचाऱ्यांनी अनेक गुन्हे उघडकीस आणून अधिकाऱ्यांना सहकार्य करून कर्तव्य बजावत पोलीस स्टेशनचे नाव उंचवण्यास मदत करून आपुलकी निर्माण केली आहे असे व्यक्तव्य पोलीस निरीक्षक गजानन पडघन यांनी निरोप समारंभ प्रसंगी व्यक्त केले यावेळी बदल्या झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना शाल, श्रीफळ व गुलाब पुष्प देवून सत्कार करण्यात आला. व त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या .


