कोलकता …पश्चिम बंगाल मधील दार्जिलिंग मध्ये आज सकाळी भीषण रेल्वे अपघात झाला असून कांचनगंगा एक्सप्रेस आणि मालगाडी मध्ये धडक झाली असून एक्सप्रेस गाडी व मालगाडीचे 3 डबे रुळावरून घसरले यामध्ये अनेक जण जखमी तर पाच जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त होत आहे अनेक जण जखमी तर पाच जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे बचावकार्य व मदत कार्य युद्ध पातळीवर सुरू असून मोठ्या संख्येने नागरिक घटनास्थळी जमले आहे . काही प्रवासी डब्याखाली अडकल्याची सुद्धा दाट शक्यता वर्तवली जात आहे .
भीषण रेल्वे अपघात कांचनगंगा स्पेशल एका बाजूने येत होते आणि त्याच बाजूने मालगाडी देखील आली एकाच ट्रॅकवर दोघी गाड्या आल्याने दोघांची टक्कर झाली आणि गाडी रुळावरून खाली घसरली अशी शक्यता वर्तवली आहे .
बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बचाव कार्य पथकांना घटनास्थळी ताबडतोब पाठवले आहे
कांचनजंगा एक्सप्रेसला रंगपाणी ते निजाबारी दरम्यान हा अपघात झाला आहे. ही गाडी सियालदहला जात असल्याची माहिती आहे. ही गाडी निजबारीसमोर उभी असताना भरधाव वेगात असलेल्या मालगाडीने पाठीमागून धडक दिली. ज्यामध्ये गाडीची तीन डबे रुळावरुन उतरले तर एका डब्याला आग लागली. घटनेची माहिती मिळताच पोलिस, रेल्वे अधिकारी आणि प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून मदतकार्य सुरू करण्यात आले आहे. गाडीच्या डब्यांमध्ये अडकलेल्या प्रवाशांची सुटका करण्यात येत आहे. कांचनजंगाच्या तीन बोगींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले असून मदत आणि बचाव कार्य सुरू आहे, अशी माहिती प्रत्यक्षदर्शीने दिली आहे. रंगा पाणी आणि निजबारी स्थानकादरम्यान हा अपघात झाला आहे. ही ट्रेन न्यू जलपाई गुडीहून निघाली होती आणि किशनगंज मार्गे सियालदाहला जात होती.

एका प्रत्यक्षदर्शी प्रवाशाने सांगितले की, ते ट्रेनमध्ये बसले होते तेव्हा मागून जोरदार धक्का बसला. त्यांना काही समजण्यापूर्वीच प्रवासी घाबरुन इकडे-तिकडे पळू लागले. सगळीकडून किंचाळण्याचा आवाज ऐकू येत होते. ते ट्रेनमधून खाली उतरले आणि मागे धावत गेले. गाडीच्या मागच्या बाजुला खूप गर्दी होती. तेव्हा कळाले की गाडीला अपघात झाला आहे.


