माणगाव येथे तीन दिवशीय अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रमाचा महिला अभ्यासवर्ग संपन्न :

भुसावळ (प्रतिनिधी ) – हा केवळ कल्याण आश्रमाचा विषय नसून भारताच्या सुरक्षितेचा प्रश्न आहे . यासाठी नियोजन करा व सध्या देशाची व समाजाची जी गंभीर स्थिती आहे ती दूर करण्यासाठी सर्वानी सहकार्य करा , देशहितासाठी व समाजकार्यासाठी लक्ष गाठा असे आवाहन उद्घाटक अ.भा.महिला प्रमुख श्रीमती बिनापाणी दासशर्मा दिदी यांनी केले .
माणगाव जिल्हा रायगड येथे तीन दिवशी आयोजित अभ्यास वर्गा मध्ये ते बोलत होते अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रम पश्चिम क्षेत्र जिल्हा महिला व सहमहिला प्रमुख यांचा अभ्यास वर्ग दिनांक 8 ,9 व 10 जून रोजी संपन्न झाला या तीन दिवशीय अभ्यास वर्गास प्रमुख पाहुणे व उद्घाटक म्हणून अ.भा.महिला प्रमुख श्रीमती बिनापाणी दासशर्मा दिदी होत्या.
आपल्या देशाच्या धर्माचे व संस्कृतीचे रक्षण व्हावे जे वनवासी जनजाती महिलांचे नेतृत्व पुढे यावे त्यांना नवनवीन मार्गदर्शन मिळावे यासाठी अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रम च्या माध्यमातून घेण्यात येणारा अभ्यास वर्ग एक संजीवनीच आहे
गावागावात जाऊन जनजाती महिलांच्या विकासासाठी कार्य करा राष्ट्रहितासाठी संघटन बनवून देशाला शक्तिशाली बनवा , असे आवाहन अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रम चे अ.भा.युवा प्रमुख वैभव सुरंगे यांनी केले . माणगाव जिल्हा अभ्यास वर्ग अध्यक्ष म्हणून विदर्भ प्रांत प्रमुख निलिमा ताई पट्टे यांनी जबाबदारी सांभाळली.पश्चिम क्षेत्र महिला प्रमुख वैशाली देशपांडे, दक्षिण व दक्षिण मध्य महिला प्रमुख कौशल्या हेगडे,सुलेखाकुमारी, वैभव सुरंगे गणेशजी गावीत , संजयजी कुलकर्णी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व भारतमाता व श्रद्धेय बाळासाहेब देशपांडे यांच्या प्रतिमा पूजनाने झाली
प्रसंगी देव धर्म आणि राष्ट्रासाठी कार्य करा असे आवाहनही करण्यात आले या अभ्यास वर्गास पश्चिम महाराष्ट्र , विदर्भ, देवगिरी प्रांत,कोकण, गोवा या पाच प्रांतांच्या महिला सहभागी झाल्या होत्या आपला देश संस्कृतीसह धर्माचे रक्षण व्हावे जनजाती वनवासी आहेत त्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे तसेच जनजाती समाजाच्या आस्था केंद्रांचे जागरण व्हावे देवी देवता संस्कृती परंपरा यांचे जतन व्हावे यासाठी जशपूर नगर छत्तीसगड येथे 1952 मध्ये श्रद्धेय बाळासाहेब देशपांडे यांनी वनवासी समाजाचा सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशाने कार्य केले आहे या समितीच्या माध्यमातून श्रद्धा जागरण ,हीतरक्षा , संपर्क प्रचार प्रसार ,खेलकुद, सेवा श्रेणी ,आरोग्य शिक्षण ,छात्रावास , ग्रामविकास युवा कार्य कुल नगरीय कार्य, महिला कार्य अशा 14 आयामांवर कल्याण आश्रमाचे संपूर्ण भारतभर कार्य सुरू असल्याची व जनजातीय संस्कृती हीच खरी भारताची सनातन संस्कृती असल्याची सविस्तर माहिती देवून महत्व वैभव सुरंगे यांनी पटवून दिले .
तर संजय कुलकर्णी यांनी आपल्या मनोगतात सांगितले की , ज्या देशाचा धर्म सुरक्षित राहिला नाही त्या देशाची संस्कृती लवकर संपते यासाठी संघर्ष करा सत्याचा विजय निश्चित होतो महिलांची ताकद ओळखा महिला कणखर व सक्षम आहेत आपला धर्म संस्कृती वाचवाल तर पुढील पिढीला ओळख करून देता येईल त्यांचे सर्व भ्रम दूर होतील व ते उत्तर देऊ शकतील कारण पुढील पिढी चुकीच्या दिशेला जात असेल तर त्यांना त्यांची अचूक जागा दाखवावी व हेच कार्य वनवासी कल्याण आश्रम करीत असल्याचे स्पष्ट करीत आजच्या महिलानी संस्कारक्षम पिढी घडवून देशाला प्रगत करण्यास व धर्म सुरक्षित ठेवण्यास सहकार्य करा असे आवाहन यावेळी केले .
गणेशजी गावीत यांनी कार्यकर्त्यांचे दायित्व व बोध या विषयावर वनवासी कल्याण आश्रम व त्यांच्या कार्यकर्त्यांचे दायित्व यावर सुस्पष्ट व उत्तम मार्गदर्शन केले . कार्य करेल तो कार्यकर्ता आदर्श कार्यकर्त्यांचे नेतृत्व दायित्व व गुण यावर संघटन होते संघटनेवर प्रेम व विश्वास असले पाहिजे , कार्यकर्ता व्यावहारिक असावा क्षमता समर्थन बुद्धी आणि विकासासाठी पूर्ण वेळ द्यावा , सेवा जागरण संघटन या तीन श्रेणीत कार्यकर्त्याने कार्य करून आदर्श कार्य व कार्यकर्त्यांची कामे करावी असे सांगून कसे व कोणते कार्य करावे याची विस्तृत माहिती दिली .
कार्यकर्त्यांनी आपले घेतलेले दायित्व ओळखा व संघटनेकरिता तळमळीने कार्य करा . हा केवळ कल्याण आश्रमाचा विषय नसून भारताच्या सुरक्षितेचा प्रश्न आहे . यासाठी नियोजन करा व सध्या देशाची व समाजाची जी गंभीर स्थिती आहे ती दूर करण्यासाठी सर्वानी सहकार्य करा , देशहितासाठी व समाजकार्यासाठी लक्ष गाठा असे आवाहन बिना दीदी यांनी केले ,
भारतामधील महिलांची ताकद दाखवा समाजकार्य करतांना आपला जनजाती समाज आमच्या संस्कृती व धर्मापासून दूर होत चालला तुटत चालला आहे त्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करा , असे नीलिमा पट्टे यांनी सांगितले . क्षेत्र महिला सहप्रमुख जास्वंदा दर्रा यांनी प्रास्ताविकात कार्याची माहिती विशद केली.
तीन दिवशीय अभासवर्ग दररोज तीन सत्रात घेण्यात आला . यामध्ये व्यक्तिमत्व विकास , बौद्धिक विकास , कार्यकर्त्यांची जबाबदारी , संघटन , नियोजन , प्रवास आदी पैलूंवर प्रकाशझोत टाकण्यात आला . तसेच प्रत्यक्षिकां सह कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आले . महिलांनी आप आपल्या प्रांतातील लोककला सांस्कृतिक कार्यक्रमात सादर केली महिलांनी गीत ,मनोगत भजन ,आरती यात उत्स्फूर्तपणे सहभाग दिला अभ्यास वर्गाचे यजमान पद कोकण प्रांताने स्विकारले होते अभ्यास वर्गाच्या यशस्वितेसाठी कोकण प्रांत महिला प्रमुख ज्योती पाटील व त्यांच्या संपूर्ण टीम तसेच पुर्ण कालीन व अंशकालीन कार्यकर्त्यांसह इतर सर्वांनी परिश्रम घेतले


