औष्णीक विज केंद्रामुळे वरणगावाच्या तापमानात वाढ : वृक्ष लागवडीची मागणी : मुख्य अभियत्याना दिले निवेदन ;

भूसावळ – तालुक्यातील दिपनगर औष्णीक विज केंद्राच्या वाढत्या विस्ताराने वरणगाव व परिसरातील शेती पिके नष्ठ तर होतच आहे त्याच बरोबर तापमानातही दोन अंशाने वाढ झाल्याने नागरिक कमालीचे त्रस्त झाल्याने वरणगावच्या माजी नगराध्यक्षासह नागरिकांनी मुख्य अभियंता यांना निवेदन दिले यावेळी त्यांनी सि आर एस फंडातून परिसरात वृक्ष लागवडीची व संगोपनाची मागणी केली आहे

दिपनगर औष्णीक विज निर्मिती केंद्रात कोळश्यापासून होणाऱ्या विज निर्मीती मुळे परिसरात कमालीचे तापमान वाढ झाली असून जळगाव जिल्हयात कमाल तापमान ४७ .३ ते गेल्याने वृद्ध व नवजात बालकांच्या अंगाची लाहीलाही होत आहे तर शेतातील उभी पिक करपून जात असून शेतकऱ्याच्या उत्पन्नावर मोठा परिणाम झाला आहे वरणगाव पर्यावरण व मानवी जिवन संरक्षण समीतीचे मुख्य अभियंता मोहन आव्हाड यांना निवेदन दिले सी आर एस फंडातून वरणगाव परिसरात वृक्ष लागवड करुण त्यांचे संगोपण करावे , जेष्ठ नागरिकांसाठी आरोग्य शिबीर घेण्यात यावे , तर भविष्यात विज केंद्राचा नवीन ६६० मेगावॅटचा प्रल्कप सुरू झाल्या नंतर परिसरावर याचा मोठा परिणाम होणार असल्याची भिती व्यक्त करीत वेळीच उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली तर निवेदनाची दखल घेत मुख्य अभियंता यांनी तातडीने उपाय योजना करण्याचे अश्वासन दिले
निवेदन देते वेळी समितीचे सुनिल काळे , मयूर शेळके , मुस्लीम अन्सारी , मिलीद भैसे , नामदेव मोरे , फजल शे नुर मोहम्मद , सुभाष पोतदार , सुनिल माळी , पितांबर पाटील , नाना चौधरी , हितेश चौधरी रामभाऊ माळी आदीसह परिसरातील नगरिक व शेतकरी उपस्थित होते