भुसावळ (प्रतिनिधी )-
येथील भुसावळ कला विज्ञान आणि पु. ओं नाहाटा वाणिज्य महाविदयालयात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव व महाविद्यालयातील अर्थशास्त्र, व्यावसायिक अर्थशास्त्र आणि बँकींग तसेच गणित विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शैक्ष. वर्ष 2020-21 साठी तृतीय वर्ष कला व वाणिज्य (अर्थशास्त्र, व्यावसायिक अर्थशास्त्र आणि बँकींग) तसेच तृतीय वर्ष विज्ञान (गणित ) विषयाची अभ्यासक्रम पुनर्रचना कार्यशाळा संपन्न झाली.यावेळी उद्घाटन समारंभाचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य डाॅ. सौ.एम.व्ही. वायकोळे या व्यासपीठावर उपस्थित होत्या. त्यांच्या समवेत उद्घाटक प्रा.व्ही.डी.पाटील,गणित अभ्यास मंडळाचे चेअरमन डाॅ.एस.आर.चौधरी,व्या. अर्थशास्त्र व बँकींग अभ्यास मंडळाचे चेअरमन डाॅ.सौ.शुभदा कुलकर्णी अर्थशास्त्र अभ्यास मंडळाचे चेअरमन डाॅ. एन.एल.चव्हाण तसेच सिनेट सदस्य प्रा.ई.जी. नेहेते, उपप्राचार्य डाॅ.एस.व्ही.पाटील, डाॅ.बी.एच. ब-हाटे, डाॅ.एन.ई.भंगाळे, डाॅ.ए.डी.गोस्वामी, समन्वयक प्रा.एस.टी.धूम, प्रा.ए.पी.नवघरे व्यासपीठावर उपस्थीत होते. उद्घाटन,स्वागत व सत्कार समारंभानंतर उद्घाटक प्रा. व्ही.डी.पाटील यांनी आपल्या मनोगतात असे सांगितले की विद्यापीठ पातळीवर अभ्यासक्रम तयार करतांना अभ्यास मंडळाला टिकांना सामोरे जावे लागते.पण टिकांचा विचार न करता धावत्या जगाचा विचार करून अभ्यासक्रमात कोणते घटक आवश्यक आहेत?, कोणते अनावश्यक आहेत? ते ओळखून अनावश्यक घटकांना काढून आवश्यक घटकांचा समावेश करावा त्यासाठी प्रथम शोध घ्यावा लागतो, वाचन करावे लागते. ते आपण केले पाहीजे.या सर्व बाबी विचारात घेऊन सद्यस्थितीत समस्यांना तोंड देता येईल असा समर्पक अभ्यासक्रम या कार्यशाळेत तयार होणे अपेक्षित आहे अशी अपेक्षा व्यक्त करून आपले विद्यापीठ 1990 मध्ये स्थापन झाले व ते आता तारूण्यावस्थेत आहे. तरूणाईला न्याय देण्यासाठी आपण सज्ज असले पाहीजे असे ते म्हणाले.
त्यानंतर गणित अभ्यास मंडळाचे चेअरमन डाॅ.एस.आर.चौधरी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.त्यात त्यांनी तृतीय वर्ष विज्ञान अंतर्गत येणा-या विषयांच्या रचनेबाबत माहिती दिली.त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डाॅ. सौ.एम.व्ही. वायकोळे यांनी अध्यक्षीय समारोप केला. त्यात त्यांनी कार्यशाळेला शुभेच्छा देऊन विविध विषयांवर सांगोपांग चर्चा करून उत्तम दर्जाचा अभ्यासक्रम तयार करावा असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.एस.टी.धुम यांनी केले, तर सूत्रसंचलन प्रा. व्ही.ए.सोळुंके यांनी केले. आभारप्रदर्शन प्रा.ए.पी.नवघरे यांनी केले.त्यानंतर टीवायबीए व टीवायबीकॉम कार्यशाळेचे तांत्रिक सत्र स्वतंत्र कक्षात घेण्यात आले. यावेळी डाॅ.शुभदा कुलकर्णी यांनी प्रथम अभ्यासक्रमाची भूमिका मांडली तसेच डाॅ.एन.एल.चव्हाण यांनी टीवायबीए . अर्थशास्त्र विषयाच्या रचनेचे सादरीकरण करून अभ्यासक्रम परिचय करून दिला. यावेळी व्यासपीठावर डाॅ. मनोज गायकवाड, डाॅ.जितेंद्र तलवारे, डाॅ.वाय.डी.हिवरे, डाॅ.ए.यु.पाटील, डाॅ.एन.एस.बोरसे, डाॅ.के.के.वाघ, डाॅ. विजय मान्टे, डाॅ.आर.एम.सरोदे, डाॅ.ए.जी.सोनवणे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थीत होते. कार्यशाळेसाठी जळगांव, धुळे,नंदूरबार जिल्ह्यातून अर्थशास्त्राचे ७५ प्राध्यापक तर गणित विषयाचे ४० प्राध्यापक सहभागी झाले.
कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी अर्थशास्त्र विभागातील प्रा. जितेंद्र आडोकार, प्रा.उज्ज्वला महाजन,प्रा.पी.एच.इंगोले, प्रा.सचिन राजपूत, प्रा. दिपक शिरसाठ, प्रा.प्रणिता राणे, प्रा.नेहा महाजन, प्रा.स्नेहल भारंबे, प्रा. काजल वारके, प्रा.भाग्यश्री भारंबे, प्रा. माधवी द्विवेदी आदींनी परीश्रम घेतले.


