भुसावळ -भुसावळ कला, विज्ञान आणि पु ओं नाहाटा वाणिज्य महाविद्यालयच्या मानव्य विद्याशाखे तर्फे आयोजित एक दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष . मोहन फालक यांच्या हस्ते करण्यात आले . यावेळी व्यासपीठावर संस्थेचे चेअरमन महेश फालक, सचिव विष्णु चौधरी, खजिनदार संजय नाहाटा, आजीवन अध्ययन निरंतन शिक्षण चे संचालक प्रा डॉ आशुतोष पाटील, प्राचार्य डॉ एस. व्ही पाटील उपप्राचार्य डॉ बी एच बऱ्हाटे, उपप्राचार्य डॉ ए डी गोस्वामी समन्वयक डॉ प्रफूल्ल इंगोले उपस्थित होते

‘प्रास्ताविक डॉ प्रफूल्ल इंगोले यांनी केले . यावेळी अध्यक्ष मोहन फालक म्हणाले नवीन शैक्षणिक धोरणाला सोमोरे जात असतांना या परिषदेचा ‘ भारतीय ज्ञान पद्धती ‘ हा विषय नाविन्यपूर्ण आहे . बाबत समाधान व्यक्त करून मार्गदर्शन केले . डॉ आशुतोष पाटील म्हणाले- भारतीय ज्ञान पद्धती याविषयावर चर्चासत्र प्रथम होत आहे याचा गर्व आहे . नवीन शैक्षणिक धोरणाबाबत चर्चासत्र आयोजित करणे गरजेचे आहे . बहुविद्याशाखा व अंतर विद्याशाखा या दोन मुद्यावर अवलंबुन आहे . शिक्षणात बदल होणे उपेक्षित आहे . अनुभव व कार्यात्मक शिक्षण विद्यार्थ्यांना देणे गरजेचे आहे . शिक्षकांनी कौशल्यपूर्ण बनून नवीन ज्ञान आत्मसात करावे . नवीन शैक्षणिक धोरणात शिक्षकांचे प्रशिक्षण होणे गरजेचे आहे . प्राचीन भारतीय परंपरा व संस्कृतीचा वर्तमान पद्धतीत बदल अपेक्षित आहे . भारतीय ज्ञान पद्धतीत शालेय शिक्षणापासून ते महाविद्यालयन पद्धती मध्ये बौध्दीक संपदेला प्रतिष्ठा व मान मिळाली पाहिजे . भारतीय ज्ञान परंपरेमध्ये भ शिक्षण, भाषा, संशोधनाचे जतन केले पाहिजे . भारतीय ज्ञान परंपरेत विविध विषयांचा समावेश .भारतीय ज्ञान परंपरा ही प्रवाही असते . गडगेबाबा ,बहिणाबाई चौधरी जगण्याची परंपरा , कौशल्य शिकवले . प्राच्य विद्या ही इंग्रजांनी सुरु केले . अभिजात परंपरा, बहुजन परंपरा, लोक परंपरा, या तिन्ही परंपरेतून लोक परंपरा महत्वाचा आहे . अभिजात संस्कृती, बहुजन संस्कृती, लोक संस्कृती यांचे समन्वय सभ्यतेचा संदेश समाजात रुजविणे महत्वाचे आहे . वेद , उपनिषद, भगवत गीता, रामायण, महाभारत, जैन व बौद्ध साहित्य यातून जगण्याचा मार्ग मिळत आहे . सुत्रसंचलन प्रा अक्षरा साबळे तर प्रा शिवानी माळी यांनी आभार मानले . दुसरे सत्रात राज्यातील इतर विभागातून आलेले संशोधक, प्राध्यापक यांनी ‘ भारतीय ज्ञान पद्धती ‘ या विषयांवर शोध प्रबंधाचे वाचन केले . यावेळी यासत्राचे अध्यक्ष म्हणून भालोद महाविद्यालयाचे इतिहास विभाग प्रमुख प्रा डॉ दिनेश महाजन हे होते . तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ डी एम टेकाडे, समन्वयक डॉ प्रफूल्ल इंगोले प्रास्ताविक व सूत्रसंचालन डॉ जे एफ पाटील यांनी केले . या परिषदेला विविध ठिकाणाहून ९० शोध निबंध आले आहेत . यापरिषदेच्या यशस्वीतेसाठी डॉ किरण वारके, प्रा दिपक पाटील, डॉ एस टी धूम , प्रा एस के राठोड, डॉ स्मिता चौधरी, डॉ स्वाती महाजन डॉ वंदना नेमाडे, यासह प्राध्यापक ,प्राध्यापकोत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले .



