भुसावळ- भाजप विरोधात बोलणाऱ्यांवर खोट्या केसेस करून त्यांची तोंड बंद करण्याचा प्रकार मोदी सरकार करत आहेत. मोदी सरकारचा पर्दाफाश राहुल गांधी यांनी केल्यामुळे त्यांची खासदारकी रद्द करून भाजपनं आवाज दाबण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करत भुसावळ शहर कॉग्रेस कमेटी चे सर्व फ्रन्टल तर्फे भुसावळ यावल रोडवरील महात्मा गांधी पुतळ्यासमोर भर पावसात मौन सत्याग्रह करण्यात आले.

यावेळी भुसावळ शहर अध्यक्ष कॉग्रेंस कमेटीचे रविन्द्र नीकंम प्रदेश उपाध्यक्ष मो मुनव्वर खान अल्पसंख्यॉक विभाग प्रदेश सचिव अनुसुचीत विभाग भगवान मेढे,शहर अध्यक्ष सलीम गवली ,जिल्हा अध्यक्ष कॉग्रेंस घरेलू कामगार संघटना राजु भाई डोगरदीवे, हमीद शेख जिल्हा सचिव,जानी गवळी,असगर भाई,,शहर अध्यक्ष महीला यास्मीन बानो, जिल्हा अध्यक्ष अनुसुचित विभागाचे अँड शेडके,शहर उपाध्यक्ष संतोष साळवे शैलेन्द्र नंनवरे , शौलेश अहीरे,राम अवतार परदेसी, प्रदीप नेहते कलीम बेग,मंगल, अतुल बावीस्कर, महेंद्र सपकाळे व कॉंग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.


