दिपनगर – येथील 500 व 660 मेगावॅट प्रकल्पाच्या रेल्वे सेटिंग साठी भूसंपादन करताना शेतकऱ्यांच्या मुलांना कंपनीत नोकरीत समाविष्ट करण्याचे आश्वासन दिले होते मात्र अद्याप पर्यंत त्या आश्वासनाची पूर्तता झालेली नाही भुसावळ औष्णिक विद्युत केंद्र प्रकल्पग्रस्त शेतकरी पुनर्वसन समितीच्या वतीने वारंवार आंदोलन करून देखील हा प्रश्न अद्याप सुटलेला नाही त्यामुळे आज मंगळवार दिनांक वीस रोजी महामार्गावर राष्ट्र रोको करण्याचा इशारा प्रकल्पग्रस्तांनी दिला होता मात्र या संदर्भात महानिर्मिती सोबत चर्चा झाल्याने हा प्रश्न तीन जून पर्यंत मार्गे लावण्याचे आश्वासन मिळालेले आहे त्यामुळे तुर्त हा आजचा रास्ता रोको स्थगित करण्यात आला असल्याचे आंदोलकांनी म्हटले आहे समितीच्या मागण्या आंदोलनाचा इशारा या पार्श्वभूमीवर प्रकल्पग्रस्त शेतकरी पुनर्वसन समिती व महानिर्मितीचे बैठक झाली या बैठकीत मुंबईतील मुख्यालयातून 30 जून पर्यंत प्रकल्पग्रस्त प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न सुटेल असे आश्वासन देण्यात आलेले आहे हा प्रश्न न सुटल्यास 20 जुलै नंतर प्रकल्पग्रस्त शेतकरी रेल्वे सायडिंगचे काम थांबवतील असा इशारा यावेळी प्रकल्पग्रस्त शेतकरी पुनर्वसन समितीचे अध्यक्ष प्रभाकर सोनवणे सचिव सुभाष झामरे यांनी दिला आहे.



