भुसावळात द केरला स्टोरी , ला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद . निर्मोही आखाड्याचे संताची सुध्दा उपस्थिती.

भुसावळ—द केरला स्टोरी ,हा केरळ राज्यातील अतिशय गंभीर विषयावर आधारित सिनेमा आहे. तेथील मुली ,महिला बेपत्ता होण्याच्या घटना आजही घडत आहेत. केरळ राज्यातून बे पत्ता झालेल्या 32000 तरुणआणि महिलांचा नेमक काय झालं? त्या मागच् सत्य या चित्रपटाच्या माध्यमातून समोर आणण्यात आलेल आहे.
द केरळा स्टोरी हा चित्रपट दहशतवादी संघटनांनी महिलांच्या केलेल्या तस्करीच्या संदर्भात सत्यता सांगतो. या महिलांच्या आयुष्याची हृदय द्रावक घटना सांगतोय. केरळ मधल्या मुली ज्यांना नर्स व्हायचं तर त्या ISIS संघटनेच्या आतंकवादी बनल्या . आपल्या देशात एखाद्या राज्यात महिला आणि तरुण मुली महिला ना कशा पद्धतीने जबरदस्तीने षडयंत्र करून त्यांना आतंकवादी बनवून आपल्या देशाला पुन्हा पारतंत्र्यात लोटण्याच कारस्थान सूरू आहे. आणि हे कारस्थान, हे सत्य भारतीय तरुण महिला मुलींना माहिती व्हावं आणि सर्व भारतीय तरुण महिला मुली सदैव सतर्क असाव्यात याकरिता हा चित्रपट भुसावळ शहरातील सामाजिक कार्यकर्ते तथा सिताराम कन्स्ट्रक्शन चे भूषण वराडे, श्री.नमो विचार मंच तथा साई निर्मल फाउंडेशनचे अध्यक्ष शिशिर जावळे यांचे सहकार्याने मोफत दाखविण्यात आला. याप्रसंगी निर्मोही आखाड्याचे संत श्री महंत कन्हैया दासजी, फैजपूर खंडोबा देवस्थान चे महा मंडलेश्वर पुरुषोत्तम दास जी यांचे उत्तर राधिकरी पवन दास जी महाराज यांची उपस्थिती होती व त्यांनी यावेळी महिलांना मार्गदर्शन केले व या चित्रपटाचा प्रचार प्रसार करण्याचे आवाहन केले. व झाशीची रणी लक्ष्मी देवी , सीता माता, देवी अहिल्या यांचे आदर्श डोळ्यासमोर ठेवून देश भक्ती च कार्य करावं असे आवाहन त्यांनी या प्रसंगी केलें.तसेच शिशिर जावळे यांनी याप्रसंगी मनोगत व्यक्त केलें . कार्यक्रम यशस्वीतेसाठी देवेंद्र वराडे ललित नेहते,ऋषिकेश शिंदे, गोसेवक रोहीत महाले,राहुल राने, दुर्गेश चौधरी किशोर प्रजापती , संजय काठोडे
आदींनी परिश्रम घेतले.