दी केरला स्टोरी वर बंदी आणा-डायरेक्टर सह पूर्ण टीमवर गुन्हा दाखल करा : भुसावळ मुस्लिम मंचची मागणी :

भुसावळ – ५ मे पासून भारतात रिलीज होणारी दि केरला स्टोरी या हिंदी सिनेमावर भारत सरकारने बंदी आणावी तसेच या सिनेमाचे डायरेक्टर व कथाकार सह इतर सर्वांवर दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल गुन्हा दाखल करावा व कडक कायदेशीर कारवाई करावी अशी एक मुखी मागणी मुस्लिम मंच भुसावल शहरातील विविध राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मुस्लिम समाजातील सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन माननीय उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत भारताची महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्म व महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल रमेश बैस यांना तक्रार अर्ज सादर करून ही मागणी केलेली आहे. सदर तक्रारअर्ज उपविभागीय अधिकारी यांना दिले . ३२००० हिंदू युवतीचे धर्म परिवर्तन ?
३२ हजार हिंदू तरुणींना धर्म परिवर्तन करून त्यांना जिहाद ला पाठविले अशी अत्यंत खोटी व कल्पो कल्पित माहिती, व आकडेवारी देऊन पिक्चरच्या डायरेक्टरने अत्यंत तिरस्कार व निषेधार्थ असे कार्य केलेले आहे त्याचा शिष्ट मंडळाने निषेध केला. त्या सिनेमातील काही प्रसंग जर सत्य असले तर ज्यांनी असे कृत्य केले त्याचा सुद्धा आम्ही निषेध करीत आहोत असे तक्रार अर्जात नमूद करून पुढे असे सुद्धा म्हटलेले आहे की भूतकाळ विसरणे हे महत्त्वाचे आहे, आम्ही आजचा काळ लक्षात ठेवायला हवा कारण भूतकाळातील घडामोडीमुळे वर्तमान खराब होता कामा नये याची आम्ही सर्वांनी काळजी घेणे आवश्यक असल्याचे सुद्धा तक्रार अर्जात नमूद आहे

इस्लाम धर्मात जबरदस्तीचे धर्मांतरास वाव नाही
इस्लाम धर्माच्या पवित्र कुराणात स्पष्टपणे नमूद आहे की धर्माच्या बाबतीत कोणतीही जबरदस्ती नाही कारण त्याचा मनाशी व विश्वासाशी संबंध असतो आणि हिःसेने विश्वास निर्माण केला जाऊ शकत नाही. तसेच इस्लाम धर्मात युद्धामध्ये महिलांचा समावेश ही नसतो किंवा महिलांवर अटॅक सुद्धा करता येत नाही. लहान मुल, वृद्ध व महिलांना युद्धात शामिल करू नये व जर युद्धात समोर आल्यास त्यांच्यावर वार करू नये असे स्पष्ट आदेश पवित्र कुराणात आहे. असे असताना इस्लाम धर्माचे अनुयायी ३२ हजार तरुणींचा धर्मांतर करून त्यांना जीहाद साठी कसे पाठवणार ?

राज्य व केंद्र शासनाची आकडे वारी व कार्यवाही

केरळ राज्यात जर खरोखरच ३२ हजार तरुणींना धर्मांतर करून जिहाद साठी पाठवले असते तर आज पर्यंत केरळ राज्य सरकारने Un पावेतो का कारवाई केली नाही? हा प्रश्न सुद्धा या तक्रार अर्जात विचारण्यात आलेला आहे.

तक्रार अर्ज सादर करताना यांची होती उपस्थिती साबीर मेंबर अध्यक्ष मुस्लिम. मंच भुसावल मौलाना अब्दुल हकीम खान मुजाहिद शेख एम आय एम शहराध्यक्ष जुनेद खान फिरोज शेख प्रहार अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष एडवोकेट ऐतेशाम मलिक साजिद बागवान युनूस मामा डॉक्टर इमरान खान अकबर शेख नजर शेख फिरोज कुरेशी मोहसीन काझी सलीम गवली काँग्रेस पार्टी निसार भाई सोहेल पठाण जाकिर बागवान समीर मन्यार सागर कुरेशी सद्दाम खाटीक अझर भाई मजहर भाई अब्रार पटेल कलीम शेख जानी गवली एजाजोद्दीन
आदींची उपस्थिती होती.