भुसावळात पुलवामा शहीदांना हुडकोवासियांनी वाहिली श्रद्धांजली

भुसावळ (प्रतिनिधी )-
१४ फेब्रवारी रोजी पुलवामा येथे झालेल्या आतंकवादी भ्याड हल्ल्याला एक वर्ष‌‌‌ पूर्ण झाले या हल्ल्यात ४४ जवान शहीद झाले. या वीर शहीद जवानांचे बलीदान व्यर्थ जाणार नाही आपण सदैव त्यांच्या ऋणात राहावे यासाठी हुडको वासियांकडून श्रद्धांजली अर्पण करून शिवशक्ती हुडको कॉलनीच्या रहिवाश्यांनी एकत्र येवून या शहीद वीरजवांना प्रती कृतज्ञता व्यक्त केली.यावेळी कॉलनीच्या ग्राऊंडवर एकत्र जमून हातात पणत्या घेवून रॅली काढण्यात आली. ही रॅली रानातला महादेव मंदिरात समाप्त झाली. रॅलीत शहीद जवान अमर रहे, वंदेमातरम, भारत माता कि जय अश्या घोषणा दिल्या. यावेळी मुलांनी देशभक्तिपर गीते सादर करण्यात आली.
प्रसंगी नारायण घोडके,पंकज न्याघळदे, ॲड निलेश भंडारी, राजेंद्र आंबोदकर, ॲड जास्वंदी भंडारी यांनी मनोगतातून देशसेवा करणाऱ्या वीर जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त केली व सर्वानां संगठीत होण्याचे,सुजाण नागरीक होण्याचे आवाहन केले. स्वाती श्रीगोंदेकर यांनी कविता व गीत सादर केले. ऋषिकेश घोडके याने बासरीवर राष्ट्रगीत सादर केले. दोन मिनीट स्तब्ध ऊभे राहून व पणत्या लावून शहीद वीर जवानांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमास मंगेश पाटील, पितांबर पाटील , स्वाती श्रीगोंदेकर , नेहा यावलकर , अर्जूना संस्थाचे सभासद नारायण घोडके यांचे सहकार्य लाभले. हुडको कॉलनीतील पुरुष महिला बहुसंख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *