संविधान बचाव सामिती चे गांधीं च्या तत्वावर आंदोलन ; अहिंसेच्या मार्गाने साखळी उपोषण सुरू २५ वा दिवस


भुसावळ (प्रतिनिधी)
येथील तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारा बाहेर एन.आर.सी.व सी.ए.ए.कायदया विरोधात गेल्या २५ दिवसापासून येथील संविधान बचाव नागरी कृती समितीच्या वतीने साखळी उपोषण सुरु आहे . गुरुवार दिनांक १३ रोजी या उपोषणा दरम्यान आंदोलन कर्त्यानी शासनाचे लक्ष वेधण्याकरीता गांधीजींच्या अहिंसेच्या मार्गानुसार आंदोलन सुरु केले आहे . या अनुषंगाने गांधी यांच्या शिकवणी नुसार ‘बुरा मत देखो , बुरा मत बोलो ,बुरा मत सुनो या तत्वां नुसार गुरुवारी आंदोलन करण्यात आले.
उपोषणकर्त्यानी यावेळी कांन , डोळे, व तोंड बंद करुन आंदोलन केले .
केंद्र सरकार लवकरच एन.आर.सी.सी.ए.ए.कायदा रद्द करावा तो अंमलात आणू नये ही मागणी करीत या काळया कायदयाचे विरोधात भुसावळ तहसील कार्यालयाच्या बाहेर २५ दिवसापासून उपोषण सुरु आहे .
यावेळी समितीचे अध्‍यक्ष हाजी सलीमसेठ चुडीवाले,माजी नगरसेवक हाजी साबीर शेख,मो.मुनव्‍वर खान, शेख पापा ,दानिश पटेल, यूनुस मामा , अजहर मजहर, अशरफ कुरेशी , हाजी सलीम पिंजारी, मौलाना अनीश फरान इलेक्ट्रिकल्स, अब्दुल रहीम कुरेशी , जुनेद खान, सयैद शहजाद, नजीर, वासिफ, रउफ ठेकेदार , पठान, वासिफ सयैद , मोहम्मद आबिद, डॉ इमरान यांच्‍यासह संविधान बचाव नागरी कृती समिती पदाधिकारी व कार्यकर्ते, तसेच नागरिक व मुस्लिम बांधव उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *