सेंट्रल रेल्वे स्कूल मध्ये निरोप समारंभ संपन्न

भुसावळ (प्रतिनिधी )- येथील रेल्वे स्कूल मधील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी शनिवार ८ रोजी निरोप समारंभ संपन्न झाला. प्रसंगी ,एन डी गांगुर्डे, सुमित्रा गांगुर्डे,एम अहमद, सतीश कुलकर्णी,सूकांत मिश्रा,सतीश कुलकर्णी,आरती रामटेके,मंगला भालेराव,स्वाती चतुर्वेदी आदी मान्यवर उपस्थित होते .
यावेळी एन डी गांगुर्डे वरिष्ठ कार्मिक अधिकारी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले त्यांनी विद्यार्थ्यांनी मेहनत करावी अभ्यास करावा पण परीक्षेची भीती बाळगू नये आणि ठराविक व्यवसायिक क्षेत्राचा विचार न करता आज उपलब्ध असलेल्या विविध संधीचा विचार करून जीवनात यशस्वी व्हावे असा मोलाचा सल्ला दिला.
सुमित्रा गांगुर्डे शैक्षणिक समुपदेशक यांनी देखील मार्गदर्शनात पेपर कसा सोडवावा, वेळेचे कसे नियोजन करावे ,आणि परीक्षेच्या दिवसांत तब्बेतीची कशी निगा राखावी याबद्दल उपयुक्त माहिती दिली. तसेच सतीश कुलकर्णी प्राचार्य , दहावी बारावीचे वर्ग शिक्षक स्वाती चतुर्वेदी, सुकांत मिश्रा, कीर्ती काळे यांनी मार्गदर्शन केले. दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांनी भावपूर्ण मनोगत व्यक्त केले ते होते तनिष्का साळवे, अरिहंत तिरपुडे, साक्षी पाटील.चंचल मिसाळ विद्यार्थ्यांनी आपल्या ज्ञानाच्या सहाय्याने उतुंग भरारी घ्यावी या संकल्पनेतून ज्ञानदीप गॅस फुग्याद्वारे उंच आकाशात सोडण्यात आला आणि विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. मान्यवरांच्या हस्ते पारीतोषिक वितरणाचा कार्यक्रम आणि रसायन शास्त्र प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. प्रदर्शनासाठी विद्यालयाच्या शिक्षिका मंगला भालेराव आणि आरती रामटेके यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष उपाध्याय ग्रंथपाल यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी साठी सतीश कुलकर्णी प्राचार्य रेल्वे स्कूल यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी यांनी परिश्रम घेतले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *