भुसावळात आनंदाची शिधा पूर्तता नाही शिवसेनेची मागणी

,भुसावळ- , २४ ऑक्टोंबर रोजी भुसावळ तालुका व शहर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे तर्फे शिंदे व फडणवीस सरकारने दिवाळी निमित्त जी गोर गरीब जनतेस जी आनंदाची शिधा १०० मध्ये देण्याचे आश्वासन दिले होते पण त्याची पूर्तता ह्या शासना कडून होत नाही त्या विरुद्ध शासकीय गोडाणावर धडक मोर्चा नेण्यात आला त्या प्रसंगी गोदान निरीक्षक श्री वाढे व नागर गोचे यांना विचारानी केली असता भुसावळ तालुक्यासाठी फक्त १० ते १५ टक्के किट उपलब्ध होऊन वाटप सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी रीतसर चलन दाखुन शिंदे फडणवीस सरकारची पोल खोल केली
या बाबत आमदार संजय सावकारे यांना फोन करून विचारणा केली असता आमदारांनी ७० ते ८० टक्के साठा आला आहे असे संगितले या करून लोक प्रतिनिधी खरं बोलतय की शासकीय अधिकारी खरं बोलतय याची विचारणा आमच्या महीला आघाडी जिल्हा संघ टींका पुनम ब-हाटे, यांनी तफावती बद्दल विचारणा केली असता आमदारांनी अर्वाच भाषेत एका महिला पदाधिकाऱ्यांशी हुज्जत घातली असे हे वक्तव्य एका लोकप्रतिनिधी कडून अशोभनीय आहे याचा आम्ही सर्व शिवसैनिक तीव्र निषेध करतो
हे सरकार फक्त जनतेची दिशाभूल करत आहे व जनतेचे प्रश्न सोडवण्यात हे सरकार अपयशी ठरत आहे
हा मोर्चा तालुका प्रमुख संतोष सोनावणे,विधान सभा शेत्र प्रमुख निलेश महाजन, सौ पुनम ब-हाटे,शहर प्रमुख दिपक धांडे,शहर प्रमुख हेमंत खंबैत,यांच्या मार्गदर्शाखाली काढण्यात आला
या बबलू बा-हाटे, वेळी उप शहर प्रमुख राकेश खरारे, सोनी ठाकूर,
पिंटू भोई,गोकुळ बाविस्कर,ललित मुथा,मनोज पवार,संदीप पाटील,सुभान गवळी,राजा कुंभार, व शिवसैनिक उपस्थित होते