.
भुसावळ – येथील रेल्वे सुरक्षा बलातील तीन सेवानिवृत्त कर्मचारी यांनी वयाच्या पासष्ठीतही अवघ्या १११ दिवसांत खडतर असलेली नर्मदा परिक्रमा पूर्ण केली.
भुसावळ रेल्वे सुरक्षा बलातील सेवानिवृत्त कर्मचारी सहाय्यक उपनिरिक्षक अरुण दयाराम ढाके, सुरेश भटा करंदीकर व हेड कॉस्टेबल विष्णू मधुकर फालक यांनी अवघ्या १११ दिवसांत खडतर असलेली नर्मदा परिक्रमा पूर्ण केली. १९ नोव्हेंबर २०२१ ते ९ मार्च २०२२ या कालावधीत म्हणजेच १११ दिवसात नर्मदा परिक्रमा सुमारे चार हजार किलोमीटर पेक्षा जास्त पायी प्रवास त्यांनी पूर्ण केला.

श्री. क्षेत्र ओंकारेश्वर (मध्यप्रदेश ) येथून नर्मदे हर च्या गजरात या प्रवासास सुरुवात करण्यात आली. नदीच्या तटातटाने मार्गक्रमण करण्यात आले, अनेक ठिकाणी डोंगरांची चढून उतरण मोठ्या प्रमाणावर नदी किनाऱ्याने आदिवासी क्षेत्र असून खडतर असा पायी प्रवास केला. मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात या राज्यातून प्रवास करीत समुद्र काठावर सागर संगम पवित्र क्षेत्र आहे. यानंतर समुद्रमार्गे जाऊन तटाचा दुसरा किनारा सुरू होतो. मिठी तलाई ते अमरकंटक पर्वता चा भाग, विंध्याचल पर्वत तसेच सातपुडा पर्वत यामधून तटातटाने नर्मदा मातेची परिक्रमा पूर्ण करण्यात आली.दोन्ही तटांवरुन मार्गक्रमण करताना हिंस्र प्राण्यांची भीती असते मात्र प्रवासादरम्यान आतापर्यंत असा त्रास झाल्याचे ऐकिवात नसल्याचे स्थानिकांनी सांगितले. सरदार सरोवर ,पुनासा डॅम, तवा डॅम यामुळे काही प्रमाणात अंतर वाढले असल्याचे परिक्रमावासीयांनी सांगितले. सुमारे चार हजार किलोमीटरपेक्षा जास्त अत्यंत खडतर पायी प्रवास हा पूर्ण करण्यात आला. दैनंदिन प्रवासात ऊन ,वारा, पाऊस ,थंडी याची तमा न बाळगता नित्यनेमाने दररोज सकाळी नर्मदा तटावरती सकाळी नर्मदा स्नान करून पूजा पाठ करून परिक्रमा मार्ग सुरू करावा लागतो. असा अनुभव त्यांनी कथन केला.
प्रवास कळत सुध्दा नाही
पायी नर्मदा परिक्रमा पूर्ण करणे अत्यंत आव्हानात्मक असले, तरी ती पूर्ण करण्यासाठी मनोभावे जिद्दीने ती नक्कीच पूर्ण करता येते. नर्मदे हर च्या गजरात प्रवास कधी पूर्ण होतो हे कळत सुद्धा नाही. आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात असून सुद्धा नर्मदा परिक्रमा यशस्वीरीत्या सुमारे चार हजार किलोमीटर पेक्षा सुद्धा पायी प्रवास करून यशस्वीरित्या पूर्ण केली. याचे मनोमन समाधान असल्याची प्रतिक्रिया अरुण दयाराम ढाके यांनी व्यक्त केली.


