भुसावळ – कोरोना काळात जिवनाची व आरोग्याची खरी किंमत समजली असून अजूनही धोका टळला नाही , आपल्या आरोग्याची काळजी आपणच घ्यावी यासाठी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे असा इशारा जेष्ठ समाजसेवक तथा भुसावळ व्यापारी संघटनेचे अध्यक्ष राधेश्याम लाहोटी यांनी व्यक्त केले .
कोरोना काळात ( वर्ष २०२०) मध्ये पत्रकार श्रीकांत जोशी यांच्या दैनिक सकाळ मध्ये प्रसिद्ध झालेल्या विविध सकारात्मक बातम्यांवर आधारीत ‘कोरोना-बंदी नव्हे संधी’ हे पुस्तक भुसावळच्या मैफल प्रकाशने प्रकाशित केले . या पुस्तकाचे प्रकाशन भुसावळ शहर व्यापारी मंडळ अध्यक्ष राध्येश्याम लाहोटी यांच्या हस्ते करण्यात आले .
माहेश्वरी भवन, राम मंदिर वॉर्ड, कासार गल्ली, भुसावळ येथे सकाळी 11वाजता आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार व सरकारी वकील अॅड. नितीन खरे तर प्रमुख पाहुणे म्हणून यावल येथील सरस्वती विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य जी.डी. कुलकर्णी , मैफल प्रकाशनचे प्रकाशक काशिनाथ भारंबे उर्फ निर्मोही , आयडीबीआय बैंकेचे सेवानिवृत्त विलास जोशी , लेखक पत्रकार श्रीकांत जोशी उपस्थित होते .
प्रारंभी उपस्थित मान्यवरांचे हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती प्रतिमेस माल्यार्पण करून पूजन करण्यात आले . प्रसंगी उपस्थित प्रमुख पाहुणे व मान्यवारांचा स्वागत सत्कार करण्यात आला . लेखक पत्रकार श्रीकांत जोशी यांनी कोरोनासारख्या भयावह परिस्थितीत सुद्धा संकटावर प्रत्येकाने मात करण्याकरीता समाजात सकारात्मता निर्माण व्हावी , नैराश्य कसे दूर होईल याचे डोळसपणे निरीक्षण करून यासाठी कोरोना-बंदी नव्हे संधी’ ही मालिका कश्या पद्धतीने वाचकांसमोर आणली याबाबत थोडक्यात माहीती प्रस्तावणेत सांगितली .
प्रकाशनपर भाषणात यावेळी लाहोटीं यांनी व्यस्तकार्यात मिळालेल्या वेळेचां सदुपयोग कसा केला , मेडीटेशन , आरोग्य सुधारण्याकरीता इम्युनिटी वाढवणे करीता , पर्यावरण स्वास्थ टिकवन्याकरीता जास्तीत जास्त कार्य केले व अनेकांना सुद्धा सांगीतले . यासाठी कोरोनात जिवनाची व आरोग्याची खरी किंमत समजली असे सांगत
कोरोना काळात जिवनाची व आरोग्याची खरी किंमत समजली . धोका अजूनही टळला नाही , आपल्या आरोग्याची काळजी आपणच घ्यावी नियमांचे पालन आवश्यक आहे असा इशाराही राधेश्याम लाहोटी यांनी दिला . जोशी यांच्या लिखाणाचे भरभरून कौतुक करीत शुभेच्छा दिल्या .
दरम्यान सकाळच्या उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे संपादक डॉ. राहुल रनाळकर यांचा सुभेच्छा संदेश व प्रस्तावनेतील अंश यावेळी आनंद सपकाळे यांनी वाचुन दाखवले.
कोणतीही गोष्ट होण्याकरीता काऱण लागते – प्रकाशक काशीनाथ भारबे
निसर्ग प्रेरणाशक्ति असून ताकद
कोरोना परिस्थितीत
प्रतिकार शक्ति बरोबरच शारीरिक ताकद तर हवीच मात्र सकारात्मक मानसिकता सुद्धा हवी असते जोशी यांनी
प्रातिनिधिक वर्णन करून या
पुस्तकाची निर्मिती केली आहे, संकटावर मात करण्याकरीता निश्चितच या पुस्तकामधुन दिशा व उमेद मिळणाऱ असा विश्वास व्यक्त केला .
प्राचार्य जी डी कुळकर्णी –
सकारात्मक दृष्टिकोण असावा समाजातील स्थान
जागतिक ऊंची वाढविल्या शिवाय राहत नाही अंगीभूत गुण माणसाला चालना देतात .असे मत व्यक्त करीत कोरोनाच्या कठिन परिस्थितीत आलेले अनुभव सांगीतले . तसेच लेखक प्राध्यापक. पत्रकार श्रीकांत जोशी यांना व परिवारास शुभेच्छा दिल्या . नीतिनजी खरे यांनी मितभाषी व संयमीवृत्ती जोपासनारे श्रीकांत जोशी यांचे कार्य व वैचारिक ऊंची यांवर प्रकाशझोत टाकत भरभरून कौतुक केले . प्रसंगी जोशी परिवाराचे कुटुंब प्रमुख विलास जोशी यांनी मनोगत व्यक्त केले व प्रतिकूल परिस्थितीत कुटुंबाचे नावलौकिक वाढवणाऱ्या लहान बंधुचे तोंड भरुन कौतुक केले .तर नाशिक येथील प्रा मानसी गोरे, प्रा. प्रविण पाटील, ज्ञानेश्वर घुले यांनी मनोगत व्यक्त केले.
सुत्रसंचालन व आभार आनंद सपकाळे यांनी व्यक्त केले . कार्यक्रमास खास नाशिकहुन विनीता दिक्षित, प्रा. जयश्री जोशी, मानसी गोरे यांची विशेष उपस्थिती होती.
यशस्वितेकरीता श्रुतीका जोशी , तन्मय जोशी , सौ धनश्री जोशी यांचेसह गौरव जोशी, श्याम माहेश्वरी, मोहन भराडे, मनिषा इखे, धनश्री इखे, यांनी परिश्रम घेतले.



