राज्यात 15 जूनपर्यंत निर्बंध कायम : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे – रुग्णसंख्या घटणार्‍या जिल्ह्यात निर्बंध शिथील तर कोरोना प्रादुर्भाव वाढत असलेल्या जिल्ह्यात निर्बंध अधिक कडक करणार :


सध्या राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असली तरी धोका कायम आहे. निर्बंध लादण्याचे काम मला नाईलाजानं करावं लागत असून रुग्ण संख्या म्हणावी तितकी अद्याप खाली आलेली नाही मात्र रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 92 टक्क्यांवर आली असल्याने ही दिलायासादायक बाब असून लवकरच 18 ते 44 वयोगटातील नागरीकांचे लसीकरण लवकरच सुरू करण्यात येणार असून राज्यात 15 जूनपर्यंत निर्बंध कायम राहणार असून ज्या जिल्ह्यात रुग्णसंख्या घटली तेथील निर्बंध शिथील करण्यात येतील मात्र प्रादुर्भाव वाढत जात असलेल्या जिल्ह्यात निर्बंध अधिक कडक असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. रविवारी फेसबुक लाईव्हद्वारे राज्यातील जनतेशी संवाद साधताना मुख्यमंत्री बोलत होते.
नव्या विषाणूत संसर्ग वाढवण्याचे प्रमाण अधिक
मुख्यमंत्री म्हणाले की, तिसरी लाट रोखणे नागरीकांच्या वागणुकीवर अवलंबून आहे. गेल्या लाटेतील विषाणू आणि यावेळी आलेल्या लाटेतील विषाणूत फरक आहे. संसर्गाचं प्रमाण वाढवण्याचं प्रमाण नव्या विषाणूमध्ये अधिक आहे. रुग्णसंख्या गेल्या वेळेच्या तुलनेत अधिक असून लसींचे उत्पादन अद्याप हवे तितके झाले नसून जून महिन्यापासून लसीचा पुरवठा सुरळीत झाल्यानंतर जशा लसी येतील त्याप्रमाणात लसीकरणाचा वेगही वाढवला जाईल, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *