वरणगावात तरुणाची आत्महत्या ;

वरणगाव –
शहरातील साधना नगर मधील चौवीस वर्षीय तरुणाने आपल्या राहत्या घरात गळफास लावुन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवार दि २६ रोजी सकाळच्या सुमारास घडली
या बाबत पोलीसानी दिलेल्या माहीतीनुसार असे कि शहरातील साधना नगर मधीत रहिवाशी गणेश श्रीराम माळी ( २४) हा आपल्या आई भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करीत असल्याने मदत करीत असे शुक्रवार रोजी सकाळच्या सुमारास बस स्थानक परिसरात भाजीपाल्याचे दुकानात लीलावातून भाजीपाला खरेदी करूण दुकानात ठेवुन घरी परत आल्यानतंर आईला जेवन मागीतले व आत मधील खोलीत जाऊन खोलीचे दार आतुन बंद केले त्यांच्या आईने जेवनाचे ताट तयार . करुन त्याला आवाज दिला मात्र खोलीतून खोलीतून भांडे पडण्याचा जोरात आवाज आल्याने शेजारीच राहणाऱ्या जवाई जितू माळी यांना आवाज दिला त्यांनी घराचे दार धक्का मारूण तोडले असता गणेशने घराला असलेल्या झरोका (खिडकी ) ला सुताच्या दोरीने गळ्याला गळफास लाऊन लोबळाळत असलेल्या अवस्थात दिसताच त्याला खाली काढून जवळच असलेल्या खासगी रुग्णालयाल दाखल करण्यात आल्यानंतर डॉक्टरानी त्याला तपासून मृत घोषीत केले
या बाबत वरणगाव पोलीस स्टेशनला दिपेश शालीग्राम पाटील यांच्या खबरीनुसार अकस्मत मृत्यूची नोंद करण्यात आली असुन घटनेचा पुढील तपास पो हे कॉ मजहर पाठण हे करीत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *