भुसावळात वेळेचे उल्लंघण : तीन दुकानदारांविरुद्ध गुन्हा ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
पोलिसांनी ठरवून दिलेल्या 10 वाजेपर्यंतच्या पेक्षाही जास्त वेळ दुकाने उघडी ठेवल्याने येथील बाजारपेठ पोलिस ठाण्यात तीन जणांविरूध्द गुन्हे दाखल करण्यात आले आहे. यामुळे व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
शनिवारी रात्री सहायक पोलिस अधीक्षक अर्चित चांडक आणि पोलिस कर्मचारी गस्त करीत असतांना रात्री 10 वाजेनंतरही शहरातील काही दुकाने उघडी दिसली त्यामुळे त्यांच्या विरूध्द गुन्हे दाखल करण्यात आले. यात अक्रम हुसेन गवळी (रा. शिवाजी नगर, भुसावळ) यांची टपरी, रवी गोविंद दुधानी (किराणा दुकान, रेल्वे स्थानक परिसर) आरि आकाश सुनील अग्रवाल (जनरल दुकान, रेल्वे स्थानक परीसर, भुसावळ) यांनी त्यांची दुकाने रात्री उशीरापर्यत सुरू ठेवल्याने त्यांच्या विरूध्द पोलिस कर्मचारी समाधान पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.
दरम्यान, अनिस खान गन्नेखान याने मॉडर्न रोडवरील पोस्ट ऑफिज जवळ आरडा-ओरड केल्याने त्यांच्या विरूध्द मुंबई पोलिस अ‍ॅक्ट नुसार कारवाई केली. यामुळे रात्री उशीरा दुकाने सुरू ठेवणार्‍यांमध्ये खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *