प्रवाशांच्या सुविधेसाठी विशेष रेल्वेगाड्यांच्या परिचालन कालावधीत वाढ

 भुसावळ (प्रतिनिधी)- रेल्वे प्रशासनाने प्रवाशांची वाढती संख्या आणि त्यांची सोय लक्षात घेऊन  वलसाड–दानापूर, उधना–मधुबनी तसेच उधना–झंझारपूर या साप्ताहिक विशेष रेल्वेगाड्यांच्या परिचालन कालावधीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. तपशील पुढीलप्रमाणे आहे:

1) वलसाड–दानापूर साप्ताहिक विशेष रेल्वे
गाडी क्रमांक 09025 वलसाड–दानापूर साप्ताहिक विशेष गाडी पूर्वी अधिसूचित  दि. 27.07.2026 पर्यंत होती. सदर गाडीचा संचालन कालावधी वाढवून आता दि. 31.08.2026 पर्यंत करण्यात आला आहे.
गाडी क्रमांक 09026 दानापूर–वलसाड साप्ताहिक विशेष गाडी पूर्वी अधिसूचित दि. 28.07.2026 पर्यंत होती. सदर गाडीचा संचालन कालावधी वाढवून आता दि. 01.09.2026 पर्यंत करण्यात आला आहे.

2) उधना–झंझारपूर साप्ताहिक विशेष रेल्वे
गाडी क्रमांक 09047 उधना–झंझारपूर साप्ताहिक विशेष गाडी पूर्वी अधिसूचित दि. 26.07.2026 पर्यंत होती. सदर गाडीचा संचालन कालावधी वाढवून आता दि. 13.09.2026 पर्यंत करण्यात आला आहे.
गाडी क्रमांक 09048 झंझारपूर–उधना साप्ताहिक विशेष गाडी पूर्वी अधिसूचित दि. 27.07.2026 पर्यंत होती. सदर गाडीचा संचालन कालावधी वाढवून आता दि. 14.09.2026 पर्यंत करण्यात आला आहे.

3) उधना–मधुबनी साप्ताहिक विशेष रेल्वे
गाडी क्रमांक 09045 उधना–मधुबनी साप्ताहिक विशेष गाडी पूर्वी अधिसूचित दि. 26.07.2026 पर्यंत होती. सदर गाडीचा संचालन कालावधी वाढवून आता दि. 13.09.2026 पर्यंत करण्यात आला आहे.
गाडी क्रमांक 09046 मधुबनी–उधना साप्ताहिक विशेष गाडी पूर्वी अधिसूचित दि. 27.07.2026 पर्यंत होती. सदर गाडीचा संचालन कालावधी वाढवून आता दि. 14.09.2026 पर्यंत करण्यात आला आहे.

प्रवासी तिकीट बुकिंगसाठी रेलवन अॅप देखील डाउनलोड करू शकतात. संबंधित विशेष गाड्यांच्या थांब्यांबाबत सविस्तर वेळापत्रकासाठी (http://www.enquiry.indianrail.gov.in) या संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा NTES अॅप डाउनलोड करावे.