नवी दिल्ली (प्रतिनिधी) ‘व्हॉईस ऑफ मीडिया’, ‘व्हॉईस ऑफ मीडिया इंटरनॅशनल फोरम’ यांच्या वतीने भारत देशाची राजधानी असलेल्या दिल्ली येथील विश्व युवक केंद्रात २७ व २८ जुलै रोजी दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. या अधिवेशनासाठी देशभरातील पदाधिकारी, ज्येष्ठ पत्रकार, संपादक, मंत्री, माध्यम तज्ज्ञ आणि विविध राज्यांतील प्रतिनिधी मोठ्या संख्येने दिल्लीत दाखल होत असून पत्रकारांच्या विविध प्रश्नांवर राष्ट्रीय स्तरावर व्यापक मंथन होणार आहे. भारतीय पत्रकारितेची सद्यस्थिती, बदलते माध्यमविश्व आणि पत्रकारितेचे भविष्य या विषयांवर परिषदेत सखोल चर्चा होणार आहे. सकाळी ९ ते सायंकाळी ६ या वेळेत आयोजित विविध सत्रांमध्ये तज्ज्ञांची व्याख्याने, परिसंवाद, मुक्त संवाद आणि अनुभवकथनाद्वारे पत्रकारितेच्या बदलत्या प्रवाहाचा आढावा घेतला जाणार आहे. या अधिवेशनात पत्रकार संरक्षण कायद्याची आवश्यकता, वृत्तपत्र स्वातंत्र्य, माध्यमांची विश्वासार्हता, पत्रकारांचे सामाजिक व आर्थिक हक्क, डिजिटल पत्रकारितेतील संधी आणि आव्हाने, फेक न्यूजवर नियंत्रण, कौशल्य विकास, माध्यम नीतिमत्ता, पत्रकार कल्याण योजना तसेच नव्या तंत्रज्ञानाचा प्रभाव अशा विविध विषयांवर सविस्तर विचारमंथन होणार आहे. विविध राज्यांतील यशस्वी उपक्रम आणि संघटनात्मक अनुभवांची देवाणघेवाण करून भविष्यातील कृती आराखडाही निश्चित केला जाणार आहे. या राष्ट्रीय अधिवेशनाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे पत्रकारांच्या हिताशी संबंधित ३० महत्त्वपूर्ण ठराव मंजूर करण्यात येणार असून ते भारत सरकारकडे सादर केले जाणार आहेत. पत्रकारांची सुरक्षा, सन्मान, सामाजिक संरक्षण, आर्थिक स्थैर्य आणि कामकाजाच्या परिस्थितीत सुधारणा करण्यासाठी या ठरावांद्वारे ठोस उपाययोजनांची मागणी केली जाणार आहे. हे केवळ निमंत्रीत पदाधिकारी पत्रकार यांच्यासाठीचे अधिवेशन आहे. ‘व्हॉईस ऑफ मीडिया’, ‘व्हॉईस ऑफ मीडिया इंटरनॅशनल फोरम’चे संस्थापक तथा आंतरराष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे, राष्ट्रीय अध्यक्ष अनिल म्हस्के यांनी देशभरातील पत्रकार, प्रतिनिधी, पदाधिकाऱ्यांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. या अधिवेशनातून पत्रकारांची एकजूट अधिक मजबूत होऊन भारतीय पत्रकारितेला नवी दिशा आणि नवी ऊर्जा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ही परिषद पत्रकारांचा आवाज बुलंद करेल – अनिल म्हस्के देशाची राजधानी नवी दिल्ली येथे होणारे ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे राष्ट्रीय अधिवेशन पत्रकारांची सुरक्षा, प्रतिष्ठा, सामाजिक संरक्षण आणि लोकशाही मूल्यांच्या रक्षणासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या परिषदेत मंजूर होणारे ठराव राष्ट्रीय स्तरावर पत्रकारांचा आवाज अधिक प्रभावीपणे पोहोचवतील. भारतीय पत्रकारितेच्या इतिहासात हे अधिवेशन एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरेल, असा विश्वास ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल म्हस्के यांनी व्यक्त केला. राष्ट्रीय अधिवेशन पत्रकार चळवळीला नवी दिशा देईल – विजय चोरडिया व्हॉईस ऑफ मीडिया महाराष्ट्र’चे प्रदेशाध्यक्ष आणि या अधिवेशनाचे संयोजक विजय चोरडिया यांनी सांगितले की, दिल्लीत होणारे हे राष्ट्रीय अधिवेशन पत्रकारांच्या हिताचे संरक्षण करणारे, संघटना अधिक सक्षम करणारे आणि भारतीय पत्रकारितेला नवी दिशा देणारे ऐतिहासिक पाऊल ठरेल. या परिषदेमुळे पत्रकारांच्या प्रश्नांवर केंद्र सरकारशी प्रभावी संवाद साधण्यासाठी भक्कम पाया निर्माण होईल. तसेच देशभरातील पत्रकारांमध्ये समन्वय, संघटनात्मक बळकटी आणि व्यावसायिक ऐक्य अधिक दृढ होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. हे शिल्लेदार त्यांच्या त्याच्या राज्याला लिड करत होणार सहभागी: व्ही. विमल बालाजी आंध्र प्रदेश, ध्रुवज्योती दास, मोदिनी मोहन भट्टाचार्य, सुमित सेनगुप्ता, स्वप्ना दत्ता, आसाम, भूषण आरोसकर, गोवा– कनुभाई सोलंकी, खालिद शेख, लक्ष्मणभाई परमार, नरेशभाई मेहेरिया, केशव सिंग सोलंकी,गुजरात, – डॉ. मनजीत सिंग दहिया, रणधीर सिंग, रघूबीर सिंग, हरियाणा, – विकास शर्मा, यशपाल सिंग, शांती स्वरूप, सुरिंदर कुमार, हिमाचल प्रदेश – ए. पी. रविकुमार, वासू,कर्नाटक – गिनेस सुनील जोसेफ, जोशी जोसेफ, जोसी थुंपानाथ, जॉय वर्गिस केरळ, – अजित कुंकुलोळ, दिगंबर महाले, नरेंद्र देशमुख, विजय चोरडिया, – हजारिमयुम बबिना देवी, खुदराकपम जोतिंद्रो सिंग, नोंगथोम्बम एलिझाबेथ, रेबिका मोईरांगथेम,मणिपूर – किरमेनलांग उरिया, श्री बाबुल डखार,मेघालय, – दीपक कांकर, दीपक शर्मा, राजीव कुमार त्रिपाठी,मध्य प्रदेश – हेमुसे-ओ मॅक्स खिया, थेजुंगुनुओ चाडी,नागालँड – अरुणा गौडा, पर्वतकुमार मिश्रा, साहिद शेख, सुकांत कुमार परिडा, ओडिशा, – अजय कुमार, अंकुश जैन,, रवी शंकर,पंजाब, – एम. कार्तिकेयन,पुडुचेरी, – गोपाळ गुप्ता, गोविंद सैनी, राकेश जैन राजस्थान, – बालाजी ए., के. मुरुगेसन, श्री ए. दुराई सामी, श्री इलाया राजा तमिळनाडू, – संगीता आर., त्रिपुरा – अजय पॉल, कौशिक अधिकारी, मणी देबनाथ, प्रदीप घोष तेलंगणा, – ब्रिजेश परिहार, हरिश्चंद्र निषाद, प्रेम पाठक, रेखा शर्मा,उत्तर प्रदेश, – दिनेश पाल गुसाईं, दिनेश सिंग परमार, जीवन सिंग, वेणी राम उनियाल,उत्तराखंड, – अमित गैन, रोनिता घोषाल, स्वप्ननील चॅटर्जी, सुमन गांगुली.पश्चिम बंगाल राष्ट्रीय शिल्लेदार संपूर्ण देशाला लिड करत होणार सहभागी: राष्ट्रीय कार्यकारणी अनिल मस्के श्रीकृष्ण चांडक महाराष्ट्र, अशोक वानखडे दिल्ली, राजसेकरन तामिळनाडू, बन्सीलाल पांचाळ हरियाणा, कौशिक अधिकारी त्रिपुरा,पर्वत कुमार मिश्रा ओरिसा, ए.बालाजी तामिळनाडू ,निरंजन शर्मा मध्य प्रदेश, सुमन गांगुली वेस्ट बंगाल, रंजना शुक्ला हरियाणा, अंजली दुबे उत्तर प्रदेश, हरधन पॉल त्रिपुरा ,हरिश्चंद्र निषाद उत्तर प्रदेश, शिबानंद पटनायक उडीसा, सुमित तिवारी उत्तराखंड, ज्योती इंद्रसिंग मणिपूर ,अमित रॉय पश्चिम बंगाल, हितेश मारू गुजरात ,सारिका पन्हाळकर- मल्होत्रा दिल्ली, सुनील जोसेफ केरळ, उत्तम दीक्षित राजस्थान ,ओकेंजीत सुदम नागालँड ,स्वप्न दत्त आसाम ,अक्षित महाजन जम्मू काश्मीर ,राजेश दुबे बिहार, परुल शर्मा हिमाचल प्रदेश, _________________________________


