मुक्ताईनगर, : भारतीय बौद्ध महासभा मुक्ताईनगर तालुका व शहर शाखेच्या नवीन कार्यकारिणीचे पुनर्गठन व निवड प्रक्रिया यशवंत भवन, तालुका शाखा कार्यालय, प्रशिक नगर, मुक्ताईनगर येथे उत्साहात पार पडली. यावेळी भारतीय बौद्ध महासभेच्या मुक्ताईनगर तालुका अध्यक्षपदी आद. रविंद्र किसन मोरे (केंद्रीय शिक्षक), सरचिटणीसपदी आद. चंद्रमणी दामू इंगळे, तर कोषाध्यक्षपदी आद. जनार्दन बाबूराव बोदोडे यांची निवड करण्यात आली. मुक्ताईनगर शहराध्यक्षपदी आद. सुमित देवेंद्र बोदडे, सरचिटणीसपदी आयु. सचिन भागवत बोदोडे, तर कोषाध्यक्षपदी आद. विनोद सुरेश भालेराव यांची निवड करण्यात आली. कार्यालयीन सचिवपदी आद. सिद्धार्थ प्रभाकर लोखंडे यांची निवड जाहीर करण्यात आली असून, शहर कार्यकारिणीतील उर्वरित पदे लवकरच भरण्यात येणार आहेत. कार्यक्रमाच्या प्रारंभी तथागत भगवान बुद्ध व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बोधिसत्व परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. आद. जनार्दन बाबूराव बोदोडे गुरुजी यांनी सामुदायिक बुद्धवंदना घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालनही त्यांनी केले. उपस्थित मान्यवरांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. सभेच्या अध्यक्षस्थानी भारतीय बौद्ध महासभा जळगाव जिल्हाध्यक्ष आद. सुमंगल तथा रविंद्र अहिरे होते. यावेळी जिल्हा कोषाध्यक्ष डॉ. प्रा. संजीव साळवे, महाराष्ट्र राज्य पर्यटन सचिव डॉ. के. वाय. सुरवाडे, जिल्हा हिशोब तपासणीस आद. पंडित धुडकू सपकाळे, जिल्हा पर्यटन प्रचार-प्रसार विभाग सचिव आद. वसंतदादा जगन लोखंडे, समता सैनिक दलाचे जिल्हा सचिव मेजर प्रमोद पोहेकर, जिल्हा पर्यटन सचिव आद. सुनील अंढांगळे, आद. डॉ. दिलीप पानपाटील गुरुजी तसेच जिल्हा संघटक आद. सोमवंशी आदी मान्यवर उपस्थित होते. मुक्ताईनगर तालुका कार्यकारिणीत संस्कार विभाग उपाध्यक्षपदी आद. गोविंदा श्रावण तायडे, प्रचार व पर्यटन विभाग उपाध्यक्षपदी आद. विश्वंभर शत्रू अडकमोल, संरक्षण विभाग उपाध्यक्षपदी आद. महेंद्र पुंडलिक शिरसोदे, हिशोब तपासणीसपदी आद. विकास दिनकर तायडे, कार्यालयीन सचिवपदी आद. राहुल युवराज सोनवणे, संस्कार सचिवपदी आद. प्रमोद चुडामण इंगळे व आद. दिलीप संतोष अहिरे, पर्यटन सचिवपदी आद. संतोष तुकाराम इंगळे, पर्यटन प्रचार-प्रसार सचिवपदी आद. गोपाळ सखाराम धुंदले, संरक्षण विभाग सचिवपदी आद. सोपान नामदेव धुंदले व आद. आकाश प्रकाश कोंगळे यांची निवड करण्यात आली. समता सैनिक दलाच्या संघटकपदी आद. विक्की सेन गायकवाड, आद. शंकर पांडुरंग इंगळे व आयु. जय अरुण कोंडाळे, प्रचार-प्रसार व पर्यटन संघटकपदी आद. वसंत पंढरी लहानसे, संस्कार विभाग संघटकपदी आद. संजय विश्वनाथ म्हसाने व आद. पंडित केशव महाले यांची निवड जाहीर करण्यात आली. यावेळी मुक्ताईनगर तालुक्यातील ग्रामीण भागातील बांधवांचे सहकार्य लाभले. नवनिर्वाचित सरचिटणीस आद. चंद्रमणी दामू इंगळे यांनी आभार मानले. सरणत्तय घेऊन बैठकीची सांगता करण्यात आली.


