भुसावळ, (प्रतिनिधी ) : १२ व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त महिला पतंजली योग समिती, भुसावळ यांच्या वतीने रविवार, दि. २१ जून २०२६ रोजी भव्य योग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होऊन योगाचा लाभ घ्यावा, असे आवाहन समितीच्या राज्य कार्यकारिणी सदस्या महानंदा पाटील यांनी केले आहे. योग हा निरोगी, आनंदी व संतुलित जीवनाचा आधार असून शारीरिक व मानसिक आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी योगाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. त्यामुळे प्रत्येकाने स्वयंस्फूर्तीने या उपक्रमात सहभागी होऊन आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी व योगाचा प्रसार करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असेही आवाहन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम योगिनी योग वर्ग, प्रीमियर हॉटेलसमोर, जामनेर रोड, भुसावळ येथे सकाळी ५.३० ते ७.०० या वेळेत आयोजित करण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यासाठी सर्व योगप्रेमींनी उपस्थित राहावे व इतरांनाही सहभागी होण्यासाठी प्रेरित करावे, असे आवाहन महानंदा पाटील यांचेसह आयोजकांनी केले आहे. "योग करा – निरोगी रहा, आनंदी रहा!" या संदेशासह योगाची शक्ती अनुभवण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे, असे समितीतर्फे सांगण्यात आले आहे.



