भुसावळ (प्रतिनिधी) : पर्यावरण संवर्धन व विकास समितीचे अध्यक्ष तथा पत्रकार डी. के. आरिकर यांच्या आदेशाने व विभागीय अध्यक्ष सुखदेव लक्ष्मण भालेराव (पत्रकार) यांच्या शिफारसीने, तसेच उत्तर महाराष्ट्र सचिव, भूगोल अभ्यासक व संशोधक प्रा. योगेश दिनकर गोसावी आणि जळगाव जिल्हाध्यक्ष देवेंद्र मधुकर वराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक कार्यकर्ते राजश्री उमेश नेवे यांची पर्यावरण संवर्धन व विकास समितीच्या भुसावळ शहर सचिवपदी निवड करण्यात आली आहे.

राजश्री नेवे हे पर्यावरण संवर्धन, वृक्षारोपण, जैवविविधता संरक्षण तसेच विविध सामाजिक प्रश्नांवर सातत्याने कार्य करणारे कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. त्यांच्या निवडीमुळे भुसावळ शहरात पर्यावरण संरक्षण, वृक्षलागवड, जलसंवर्धन आणि जनजागृतीसंदर्भातील विविध उपक्रमांना अधिक चालना मिळेल, असा विश्वास समितीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
पर्यावरणविषयक जनजागृती, नैसर्गिक संसाधनांचे जतन आणि समाजहिताच्या उपक्रमांमध्ये राजश्री नेवे यांचे योगदान महत्त्वपूर्ण राहिले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली समितीच्या माध्यमातून भुसावळ शहरात पर्यावरण संरक्षणासाठी व्यापक अभियान राबविण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले.
या निवडीबद्दल विविध सामाजिक, पर्यावरणप्रेमी व नागरिक बांधवांकडून राजश्री नेवे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, भविष्यात पर्यावरण संवर्धनासाठी अधिक प्रभावीपणे कार्य करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला आहे.


