भुसावळ (प्रतिनिधी) – हिंदूसूर्य वीरशिरोमणी महाराज महाराणा प्रतापसिंग यांच्या जयंतीनिमित्त समस्त राजपूत समाज भुसावळ शहर व तालुक्याच्या वतीने 2026 मध्ये येणाऱ्या तारीख व तिथीनुसार जयंती साजरी करण्यासाठी भुसावल नगरपालिकेचे नगरसेवक श्री. महेंद्रसिंग उर्फ पिंटूभाऊ ठाकूर, ज्येष्ठ पत्रकार संजयसिंग चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली विश्वकर्मा मंदिर गवळीवाडा भुसावळ येथे झाली. त्यात सर्वप्रथम श्री.गणेशजी, भगवान विश्वकर्मा तसेच वीरशिरोमणी महाराणा प्रतापसिंगजी यांचे पूजन करण्यात आले यावेळेस मार्गदर्शन करताना डॉ. सुरेंद्र सिंग पाटील संचालक पर्यावरण जागर प्रतिष्ठान यांनी हिंदूसूर्य महाराज महाराणा प्रतापसिंग यांना जंगल व झाडे अत्यंत प्रिय होते

सद्यस्थितीत काही कारणास्तव वृक्षतोड मोठ्या प्रमाणावर होतं असून अशुद्ध हवेची निर्मिती होतं मोठ्या प्रमाणात वातावरणात प्रदूषण निर्माण होत आहे त्यामुळे मानवासहित सर्व सजीव सृष्टीला अनेक संकटांचा सामना करावा लागत असून जीवन जगणे कठीण झाले आहे तरी येणाऱ्या जयंतीला घरातील प्रत्येक सदस्याने सर्व सजीवांना आवश्यक वृक्षाचे वटवृक्षात रूपांतर होणारी तसेच विविध फळ फुलांचे दीर्घकाळ टिकणारी झाडे संगोपणासहित लावावे व आपला देश पर्यावरण मुक्त होण्यास आपला हातभार लावत थोर महापुरुषांच्या जयंतीला वृक्ष लागवड करून आदर्श निर्माण करावा असे आवाहन केले.


