भुसावळ (प्रतिनिधी )-

उन्हाळ्याच्या तीव्र झळांसोबतच शासकीय रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे सद्गुरु अनिरुद्धबापूंच्या प्रेरणेतून भूसावळमध्ये शिबिर झाले. अनिरुद्ध अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट, श्री अनिरुद्ध आदेश पथक आणि अनिरुद्ध समर्पण पथक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शबिरात भुसावळ केंद्रातील ५३ त्यांनी सहभाग घेत बांधिलकी नपली.
दरवर्षीप्रमाणे यंदा महाराष्ट्र आणि तर राज्यांमधील १०० हून अधिक सद्गुरु श्री अनिरुद्ध उपासना केंद्र येथे या रक्तदान शिबीरांचे आयोजन करण्यात आले होते. उन्हाळ्यात शस्त्रक्रिया आणि अपघाताच्या रुग्णांसाठी रक्ताची निकड भासते. हीच बाब लक्षात घेऊन बापूंनी दिलेल्या सेवा मंत्राचे पालन करत हजारो स्वयंसेवक या कार्यात सहभागी झाले आहेत. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी सद्गुरु श्री अनिरुद्ध उपासना केंद्र येथील स्वयंसेवकांनी शिस्तबद्ध नियोजन केले होते. रक्तदात्यांची नोंदणी, प्राथमिक तपासणी आणि संकलन प्रक्रियेत डिझास्टर मॅनेजमेंटच्या प्रशिक्षित स्वयंसेवकांनी मोलाची भूमिका बजावली. या कार्यातून प्रत्येक दात्याने सद्गुरु कार्यासाठी आपला खारीचा वाटा उचलल्याची भावना व्यक्त केली.
टंचाईच्या काळात शासकीय रक्तपेढीला मोठे बळ
भुसावळ येथील केंद्रावर सकाळपासूनच रक्तदात्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता. जळगाव येथील गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजच्या रक्तपेढीने या संकलनाचे काम चोख बजावले. उन्हाळ्यातील टंचाईच्या काळात हे ५३ बॅग रक्त शासकीय रुग्णालयातील गरजू रुग्णांसाठी उपयोगी ठरेल. उन्हाळ्यात रक्ताचा साठा कमी होतो, अशा वेळी आध्यात्मिक संस्थांनी पुढाकार घेणे कौतुकास्पद आहे, असा सूर यावेळी उमटला,


