लेवापाटील समाजाविरुद्ध आक्षेपार्ह पोस्टचा भोरगाव लेवा पंचायत भुसावळ शाखे तर्फे निषेध; कारवाईची मागणी, प्रशासनास दिले निवेदन ;

भुसावळ (प्रतिनिधी )- लेवापाटील समाजाविरुद्ध आक्षेपार्ह पोस्टचा भोरगाव लेवा पंचायत भुसावळ शाखे तर्फे निषेध करण्यात आला असून कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
येथील माजी नगरसेवक मुकेश गुंजाळ यांनी फेसबुकवरील एका पोस्टवर लेवापाटील समाजाबद्दल अत्यंत वाईट, आक्षेपार्ह व समाजभावना दुखावणारी टिप्पणी केल्याचा.भोरगाव लेवा पंचायत भुसावळ शाखेच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला आहे.
संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, सोशल मीडियावर कोणत्याही समाजाबद्दल अपमानास्पद भाषा वापरणे हे निषेधार्ह असून त्यामुळे समाजात तेढ निर्माण होण्याची शक्यता असते. अशा प्रकारच्या वक्तव्यांमुळे समाजातील नागरिकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.
भोरगाव लेवा पंचायत भुसावळ शाखेच्या वतीने संबंधित व्यक्तीविरोधात योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भोरगाव लेवा पंचायत भुसावळ शाखेचे अध्यक्ष सुहास चौधरी यांनी केली आहे. त्याच बरोबर भोरगाव लेवा पंचायतीचे सुभाष भंगाळे, आर. जी. चौधरी, अनिल वारके संजय पाटील , शरद फेगडे, धनंजय पाटील व इतर सर्व संचालकां तर्फे निवेदन
प्रशासनाकडे म्हणजेच प्रांत कार्यालयात व बाजारपेठ पोलीस स्टेशन मधे देणात आले आहे. तसेच भविष्यात कोणीही सोशल मीडियाचा गैरवापर करून समाजाविरुद्ध आक्षेपार्ह वक्तव्य करू नये, असे आवाहनही करण्यात आले.
यावेळी शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी समाजातील एकोपा व सौहार्द टिकवून ठेवण्यासाठी सर्वांनी जबाबदारीने वागण्याची गरज व्यक्त केली.