भुसावळ (प्रतिनिधी ) –

मुंबई विभागात घेण्यात आलेल्या मेगा ब्लॉकमुळे भुसावळकडे येणाऱ्या रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक विस्कळीत झाले प्रामुख्याने प्लॅटफॉर्म जळगाव स्थानकावर उपलब्ध नसल्याने शहरापासून ८ किमीवर सेवाग्रामसह सहा गाड्या टप्याटप्याने थांबवण्यात आल्या. त्यामुळे त्या सरासरी अर्धा तास विलंबाने धावल्या.
मुंबईकडून जळगावकडे येणाऱ्या गाड्या विलंबाने येत असतानाच, त्याच वेळी जळगाव स्थानकात मुंबईकडे जाणाऱ्या गाड्या दाखल झाल्या होत्या. स्थानकातील प्लॅटफॉर्मवर जागा नसल्याने रेल्वे प्रशासनाने मुंबईकडून येणाऱ्या गाड्यांना आउटरलाच सिग्नल देऊन रोखले. डब्यांमध्ये पंख्यांची हवाही गरम लागत असल्याने वृद्ध, महिला व बालकांची गैरसोय झाली.


