जळगाव (प्रतिनिधी )- महिला व बाल विकास विभाग जळगांव यांच्या सहकार्याने विद्यार्थिनींच्या व महिलांच्या सुरक्षिततेसाठी व त्यांना आवश्यक त्या वेळी मदत मिळावी या उद्देशाने विशेष जनजागृती उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाअंतर्गत मुलींना व महिलांना विविध हेल्पलाईन क्रमांकांची सविस्तर माहिती देण्यात आली.

कार्यक्रमात महिला व बालविकास विभागाच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थिनीं व महिलांनी आपत्कालीन परिस्थितीत कोणत्या क्रमांकावर संपर्क साधावा, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच Women Helpline (1091), Childline (1098) आणि Police Emergency Service (100) या महत्त्वाच्या हेल्पलाईन क्रमांकांची माहिती देण्यात आली.
या उपक्रमाद्वारे विद्यार्थिनींमध्ये व महिलांन मध्ये आत्मविश्वास वाढविणे, संकटसमयी योग्य निर्णय घेण्याची क्षमता विकसित करणे आणि त्यांच्या सुरक्षिततेबाबत जागरूकता निर्माण करणे हा मुख्य उद्देश होता. विद्यार्थिनीं व महिलांनी कोणत्याही अडचणीच्या प्रसंगी न घाबरता त्वरित मदत मागण्याचे आवाहन केले.
या उपक्रमासाठी महिला व बालविकास अधिकारी ऋषिकेश काळे मुला मुलींचे बालगृह अधिक्षक रविकिरण अहिरराव प्रवीण पाटील यांचे सहकार्य लाभले या प्रसंगी नारीशक्ती उद्देशीय संस्था अध्यक्ष सौ मनिषा पाटील आशा मौर्य रेणुका हिंगू वंदना मंडावरे राधिका पाटील विश्वनाथ फेगडे राजेंद्र सूर्यवंशी शरयू पाटील अथर्व पाटील हे उपस्थित होते


