संत रोहिदास जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शालेय पाट्यांचे वाटप व स्नेहभोजन :

काहूरखेडे, ता. भुसावळ :
“मन चंगा तो कठौती में गंगा” या विचारांनी समाजाला दिशा देणारे संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त राधाकृष्ण श्री संत शिरोमणी गुरु रविदास महाराज सेवा ट्रस्ट, काहूरखेडे यांच्या वतीने सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, काहूरखेडे येथील विद्यार्थ्यांना शालेय पाट्यांचे वाटप करण्यात आले तसेच सर्व विद्यार्थ्यांसाठी स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आली. या उपक्रमामुळे शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये आनंद व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

संत रविदास महाराज यांनी दिलेले समता, बंधुता व मानवतेचे विचार लहान वयातच विद्यार्थ्यांच्या मनावर रुजावेत तसेच शिक्षणाबाबत सकारात्मक दृष्टिकोन निर्माण व्हावा, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.

कार्यक्रमास ट्रस्टचे पदाधिकारी, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी संत रविदास महाराज यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व शुभेच्छा दिल्या.