रावेरमध्ये मुसळधार पाऊस: नागझिरीला पूर, अजंदे गावाचा संपर्क तुटला ; अतिवृष्टीने 11 घरांची पडझड, 5 बकऱ्या ठार, 121 हेक्टरवरील पिकांचे नुकसान : नुकसानीचे पंचनामे करण्याच्या आमदार अमोल जावळे यांच्या प्रशासनाला सूचना

रावेर (प्रतिनिधी ) – रावेर शहर आणि परिसरात रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. संततधार पावसामुळे नागझिरी नदीला पूर आला असून, यामुळे अजंदे गावाचा तालुक्याशी असलेला संपर्क तुटला आहे. शहराच्या अनेक भागांमध्ये पाणी साचल्याने नागरिकांची मोठी गैरसोय झाली अतिवृष्टीने रावेर तालुक्यात 11 घरांची पडझड, 5 बकऱ्या ठार, 121 हेक्टरवरील पिकांचे नुकसान : नुकसानीचे पंचनामे करण्याच्या आमदार अमोल जावळे यांनिभ प्रशासनाला सूचना दिल्या

रात्री तीन वाजल्यापासून सुरू असलेल्या पावसामुळे शहरातील नाले आणि गटारे तुंबली आहेत. यामुळे रस्त्यांवरून पाण्याचे लोंढे वाहत होते, ज्यामुळे अनेक ठिकाणी वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. बक्षीपूर, रमजीपूर आणि सिंदखेडा या गावांनाही पावसाचा मोठा फटका बसला असून, काही घरांमध्ये पाणी शिरल्याचे वृत्त आहे.

शहरातील जुन्या नाल्यावर झालेल्या अतिक्रमणामुळे पाण्याचा निचरा होण्यास अडथळा निर्माण झाला आहे. यामुळे अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले असून, नगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांना पाणी उपसण्यासाठी आणि रस्ते मोकळे करण्यासाठी युद्धपातळीवर काम करावे लागत आहे.

दरम्यान, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी खबरदारी म्हणून शहरातील सर्व शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, पूरस्थितीवर बारीक लक्ष ठेवले जात आहे.

रावेर तालुक्यात पावसाने रविवारी रात्री जोरदार हजेरी लावली. यामुळे नागझिरी नदीला पूर आल्याने रावेर शहरासह रामजीपूर, बक्षीपूर गावात पाणी घुसल्याने नागरिकांची धांदल उडाली. रावेर अजंदा रस्त्यावर या नदीचे पाणी आल्याने हा रस्ता दुपारपर्यंत वाहतुकीसाठी बंद झाला होता. या पावसामुळे 5 बकऱ्या ठार झाल्या असून 11 घरांची पडझाडं झाली आहे. तर 121 हेक्टर वरील पिकांचे नुकसान झाले आहे. निवासी उप जिल्हाधिकारी अर्चना मोरे, प्रभारी प्रांतधिकारी गायकवाड तहसीलदार बी ए कापसे यांनी नुकसानीची पाहणी केली.आमदार अमोल जावळे यांनी नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत.

रविवारी रात्री वादळी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने नागझिरी नदीला आलेल्या पुरामुळे शहरातील काठावरील घरात पाणी घुसले होते. तसेच या पुराच्या पाण्यात शहरातील कॉलनी भागात पाणी पुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी वाहून गेली होती. युद्धपातळीवर काम करून संध्यकाळपर्यंत जलवाहिनी जोडण्यात आली आहे. दरम्यान पुराचे पाणी रावेर-अजंदा रस्त्यावर आल्याने अजंदा व पुढे जाणाऱ्या गावांची वाहतूक खंडीत झाली होती. रात्री वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने अनेक ठिकाणी विजेचे खांब उन्माळून पडले असून तारा तुटल्याने विजपुरवठा खंडीत झाला होता. आज रहिवाशी भागातील वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. निवासी उप जिल्हाधिकारी अर्चना मोरे, प्रभारी प्रांतधिकारी गायकवाड, तहसीलदार बी ए कापसे यांनी नुकसानग्रस्त भागाला भेट देऊन पाहणी केली. रावेर येथील सरदार जी जी हायस्कुलमधील काही झाडे रात्रीच्या वादळात उन्मळून पडली आहेत. त्यामुळे विध्यार्थ्यांना अडचणींतून वाट काढावी लागत आहे. रावेर-भाटखेडा रस्त्यावरील मोरी पुलाजवळ रस्त्याचा काही भाग खचला असल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी धोकेदायक ठरला आहे.

11 घरांची पडझाडं 5 बकऱ्या ठार

या पावसाने विवरे बुद्रुक(1), जुनोना(1), केऱ्हाला खुर्द(1), उटखेडा(1), बक्षीपूर(3), गोलवाडे(1), शिंगाडी(1), लालमाती(2) या गावातील 11 घरांची पडझड झाली आहे. तर बक्षिपूर येथील नरेंद्र किसन महाजन यांच्या 5 बकऱ्या ठार झाल्याने त्यांचे पशुधनाचे नुकसान झाले आहे.

162 शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान

या पावसाने रावेर तालुक्यातील 162 शेतकऱ्यांचे 121 हेक्टरवरील मका कापूस व केळीचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज महसूल विभागाने वर्तवला आहे. यात खानापूर, चोरवड, अहिरवाडी, केऱ्हाळा खुर्द, केऱ्हळा बुद्रुक, रसलपूर, मोरगाव खुर्द, अजंदे, नांदूरखेडा, निंबोल या गावांच्या शेत शिवरातील केळी, मका व कापूस या पिकांचे नुकसान झाले आहे.