भुसावळात लवकरच 21 हजार पथदिव्यांना लागणार टायमर –

भुसावळ : शहरातील विविध भागातील सुमारे 21 हजार पथदिव्यांना पालिकेच्या माध्यमातून टायमर लावण्यात येणार असून पंधरवड्यातच प्रत्यक्ष कामाला सुरूवात होणार आहे. शहरातील पथदिव्यांच्या माध्यमातून होणारी वीजेची उधळपट्टीला ब्रेक लागणार आहे. पालिकेच्या माध्यमातून ही संकल्पना राबविली जाणार आहे
शहरातील विविध भागात पालिकेचे सुमारे 21 हजार पथदिवे लावले आहे. विविध वॉर्ड, नगर, कॉलन्या, रस्त्यावरील दुभाजकांमध्ये लावलेले पोलवर पथदिवे दिवसादेखील सुरू राहत असल्याने विजेचा अपव्यय होत होता. यासाठी पालिकेकडून शहरातील पथदिव्यांना टायमर लावण्यात येत आहे. आमदार संजय सावकारे, मुख्याधिकारी महेश वाघमोडे तसेच वीज विभागाचे अभियंता व अन्य अधिकार्‍यांमध्ये बैठक होवून त्या संदर्भात चर्चा करण्यात आली. शहरात पथदिव्यांना लावले जाणार्‍या टायमरची वेळ साधारत: संध्याकाळी 6.30 ते सकाळी 6.30 अशी ठेवली जाणार आहे. ऋतू पाहून ही वेळ ठरणार आहे. हल्ली शहरातील पथदिव्यांचे 110 पॉइंट बंद करण्यासाठी एक तासाचा वेळ लागत आहे. पावसात शॉक लागण्याची शक्यता असल्यने टायमर हे फायदेशीर ठरतील व यासाठी 10 लाखांचा खर्च होणार आहे.