भुसावळातील महिलेचा रीक्षा अपघातात मृत्यू :नियंत्रण सुटल्याने उलटली रीक्षा : अ‍ॅपे चालका विरुद्ध गुन्हा –

जामनेर : भरधाव अ‍ॅपे रीक्षा उलटल्याने भुसावळातील महिलेचा मृत्यू झाला तर सहप्रवासी जखमी झाल्याची घटना शिंगायत गावाजवळ 25 रोजी दुपारी चार वाजता घडली होती. याप्रकरणी अ‍ॅपे चालकाविरोधात जामनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. लिलाबाई बाबू मेश्राम (भुसावळ) असे मयत महिलेचे नाव आहे.
नितीन गौतम बोरकर (33, पिवळी नगदी, कामठी रोड, नागपूर) यांनी जामनेर पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार, 25 रोजी दुपारी चार वाजता ते मेहुणी लिलाबाई मेश्राम यांना घेवून सामरोद, ता.जामनेर येथून भुसावळकडे अ‍ॅपे रीक्षा (एम.एच.19 सी.डब्ल्यू.2102) ने येत असताना रीक्षा चालक अक्षय विकास पाटील (खंडाळा, ता.भुसावळ) याने अत्यंत भरधाव वेगाने व बेपवाईने रीक्षा चालवल्याने ती उलटली व या अपघातात लिलाबाई मेश्राम यांचा मृत्यू ओढवला तर अन्य सहप्रवासी जखमी झाले. अपघाताला कारणीभूत ठरल्याप्रमाणे रीक्षा चालक अक्षय पाटील विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्या मार्गदर्शनााली हवालदार सुनील जोशी करीत आहेत.