“

भुसावळ – येथील दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयात नॅशनल कॉन्फरन्स ऑफ इंनोवेशन्स इन बायो जियो केमिकल सायन्सेस या विषयावरची नॅशनल कॉन्फरन्स आज संपन्न झाली. या कॉन्फरन्स साठी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या रसायन शास्त्र विभाग प्रमुख प्रा डॉ दिपक एस दलाल हे उद्घाटक म्हणून उपस्थित होते. उद्घाटन सत्राचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ आर पी फालक उपस्थित होते. या राष्ट्रीय कॉन्फरन्स चे उद्घाटन दिप प्रज्वलन, सरस्वती पूजन आणि संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्व. दादासाहेब देविदास नामदेव भोळे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन करण्यात आले.
आपल्या उद्घाटनपर भाषणात बोलताना प्राध्यापक दिपक एस दलाल म्हणाले की अशा पद्धतीच्या कॉन्फरन्स या समाजासाठी दिशादर्शक असून त्या मधून सशक्त समाजाची निर्मिती होत असते. रसायन शास्त्र, वनस्पती शास्त्र, प्राणी शास्त्र आणि भूगोल या सर्व विषयांची व्याप्ती वेगवेगळी असली तरी त्यामधील तत्वे मानवी जीवनासाठी अत्यंत मौल्यवान आहेत. म्हणून या सगळ्या शास्त्रांचा वापर करून मानवी समाजा समोरची आव्हाने, अडचणी आणि प्रश्न सोडवण्यासाठी त्यांचा उपयोग करता आला तर समाजाची प्रगती होऊ शकेल म्हणून अश्या विविधांगी परिषदांमध्ये केवळ सहभाग न घेता प्रत्यक्ष संशोधन कार्य केल्यास आपण सामाजिक प्रश्नाची उत्तरे नवनवीन पद्धतीने सोडवू शकू.
आपल्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ आर पी फालक यांनी देशभरातून या कॉन्फरन्स मध्ये सहभागी झालेल्या प्राध्यापक,संशोधक विद्यार्थी आणि संशोधक मार्गदर्शकांचे स्वागत केले. अमर्याद वृक्षतोड, अतिशय जास्त ऊर्जा वापराची मानसिकता आणि नैसर्गिक संसाधनांचे मोठ्या प्रमाणात वापर या मुळे निर्माण झालेल्या समस्यांचा उल्लेख करून पर्यावरण आरोग्य आणि शिक्षण या त्रिसूत्रीचा वापर करून मानवी समजा समोर असणारे प्रश्न सोडवले पाहिजेत असे मत व्यक्त केले. आपल्या महाविद्यालयात असलेल्या संशोधन प्रयोग शाळेचा फायदा कुणाला ही घेता येईल असे सांगून उपस्थित संशोधक विद्यार्थ्याना शुभेछ्या दिल्यात.
कॉन्फरन्स च्या दुसऱ्या सत्रात विर नर्मद साऊथ गुजरात विद्यापीठाच्या रसायन शास्त्र विभागाचे प्रमुख प्रा डॉ नवीनचंद्र पटेल यांनी त्यांच्या मुख्य बीजभाषणात औषधांचा इतिहास विषद करून औषध निर्मिती मधील विविध क्लिष्ट प्रक्रिया स्पष्ट करून सांगितल्या. या वेळी कोणतेही औषध निर्माण करीत असताना शास्त्रज्ञ किती प्रकारचा अभ्यास करतात, कशा पद्धतीने संशोधन प्रक्रिया होते आणि दहा ते पंधरा वर्षांच्या सातत्यपूर्ण मेहेनत मधून औषधाची निर्मिती होते हे सांगून इतिहास काळापासून चे औषध निर्माण क्षेत्रात नोबल पारितोषिक मिळालेल्या संशोधकांच्या संशोधनाची माहिती उपस्थितांना दिली.
बीजभाषणाच्या दुसऱ्या सत्रात राणी दुर्गावती विद्यापीठाच्या प्रा संजीव कुमार पाण्डेय यांनी नवीन शैक्षणिक धोरणाची माहिती देत असताना १९८६ ते २०२० दरम्यानचा शैक्षिणक आराखडा आणि नवीन शिक्षनिक धोरण या मधील फरक स्पष्ट करीत असताना सांगितले की नविंनधोरणात विद्यार्थ्याला त्याला आवड असेल त्या विषयात त्याचे अध्ययन करून जगण्यासाठी आवश्यक कौशल्य विकसित करता येईल. ह्या शिक्षण प्रणाली मधील अभ्यासक्रमा मधून केवळ पदवी घेतलेला विद्यार्थी तयार होणार नाही तर कौशल्य असणारा समृध्द नागरिक तयार होईल. असे मत व्यक्त केले.
या कॉन्फरन्स मध्ये २५ संशोधक विद्यार्थी आणि संशोधक प्राध्यापकानी त्यांचे शोध निबंध ओरल स्वरूपात तर २६ संशोधकांनी पोस्टर स्वरूपात सादर केलेत त्या पैकी ओरल स्वरूपात सादर केलेल्या शोध निबांधापैकी डॉ चंद्रकांत सरोदे यांना प्रथम पारितोषिक, प्रा कृपाली रमेश बरडे यांना द्वितीय तर प्रा विकास वाघुळदे यांना तृतीय पारितोषिक देवून तर पोस्टर स्वरूपात सादर केलेल्या संशोधकांपैकी डॉ सचिन कोल्हे, यांना प्रथम, प्रा तकदिस जी शेख यांना द्वितीय तर प्रा संगीता भिरुड यांना तृतीय पारितोषिक देवून गौरवण्यात आले.
समारोप समारंभ प्रसंगी एल दी जे कॉलेज नागपूर येथून सहभागी झालेल्या प्रा कृपाली बरडे आणि डॉ चंद्रकांत सरोदे यांनी कॉन्फरन्स बद्दलची आपली मते. व्यक्त करीत असताना महाविद्यालयाने आयोजन करीत असताना घेत असलेल्या प्रयत्न आणि उत्तम नियोजनाचे कौतुक केले.
समारोप समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत असताना प्रा गुणवंत सोनवणे यांनी येणारा भविष काळ हा अस्यच पद्धतीने विविधांगी संकल्पना एकत्र करून करावयाच्या प्रयत्नांचा आहे म्हणून आज ची ही कॉन्फरन्स अत्यंत महत्वाची आहे. असे मत व्यक्त केले. त्याच प्रमाणे भविष्यातील प्रश्न सोडवण्यासाठी मूलभूत प्रश्नांचा अभ्यास आणि अत्यंत कमी खर्चात निर्माण होणारे तंत्रज्ञान विकसित केले जावे अशी अपेक्षा व्यक्त केली. समारोप समारंभाचे अध्यक्ष म्हणून बोलताना प्राचार्य डॉ आर पी फालक यांनी उपस्थितांना शुभेछ्या देवून पारितोषिक विजेत्या प्राध्यापकांचे कौतुक केले मात्र त्याच वेळी इतर संशोधकांनी सादर केलेले संशोधन हिनितर नवीन संशोधक विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त असल्याचे सांगितले.
उद्घाटन समारंभ आणि समारोप समारंभाचे सूत्र संचालन प्रा डॉ दयाघन एस राणे यांनी तर आभार प्रा डॉ माधुरी पाटील यांनी मानले. कॉन्फरन्स चे कन्वेनर प्रा डॉ जी पी वाघुळदे, समन्वयक प्रा डॉ माधुरी पाटील प्रा निर्मला वानखेडे, प्रा संजय चौधरी आणि ऑर्गनायझींग सेक्रेटरी प्रा डॉ राजेश ढाके, डॉ संजय चौधरी, डॉ अनिल सावळे, डॉ, जयश्री सरोदे, प्रा श्रेया चौधरी, डॉ अंजली पाटील, डॉ जे बी चव्हाण प्रा दिपक जैस्वार , प्रा धनश्री नेहते, प्रा भावना चौधरी, प्रा जागृती सरोदे, प्रा आरती नवघरे, प्रा आरती भोई, प्रा सुशीला बाटे, प्रा गायत्री नेमाडे, सुधाकर चौधरी, प्रकाश चौधरी, प्रकाश सावळे, राजेश पाटील, सुनील ठोसर, दिपक महाजन ,विजय पाटील महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेत घेतले


