भुसावळ – येथील कला, विज्ञान आणि पु. ओं.नाहाटा वाणिज्य महाविद्यालयातील सामाजिक शास्त्र आणि अर्थशास्त्र विभाग अंतर्गत सरदार वल्लभभाई पटेल जयंती राष्ट्रीय एकता दिन साजरा करण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ताप्ती एज्युकेशन सोसायटी भुसावळ, चे अध्यक्ष माननीय डॉ. मोहनभाऊ फालक चेअरमन माननीय श्री महेश भाऊ फालक व्यासपीठावर उपस्थित होते त्यांच्या समवेत प्राचार्य डॉ. सौ .एम. व्ही. वायकोळे उपप्राचार्य डॉ.एस. व्ही. पाटील डॉ. बी. एच .बऱ्हाटे डॉ. निळकंठ भंगाळे डॉ. ए .डी .गोस्वामी एन.एस. एस. चे एरिया समन्वय डॉ.पी.ए .आहेरे कार्यक्रमाधिकारी डॉ.आर .एस. नाडेकर एन.सी.सी.च्या प्रमुख डॉ. स्मिता चौधरी प्रा. डी .एन .पाटील प्रा. हर्षल पाटील आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि फोटो पूजन झाल्यानंतर कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक डॉ. आर .एस. नाडेकर यांनी सर्वांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ दिली त्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल यांच्या कार्याला उजाळा देण्यात आला त्यात 1917 _18 मध्ये खेडा येथे ओला दुष्काळ पडला त्यात शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले जमिनी वाहून गेल्या प्राप्त परिस्थितीत सरकारने शेतसारा माफ करणे प्राप्त होते परंतु सरकारने शेतसारा माफ केला नाही सरदार वल्लभ भाई पटेल यांनी महात्मा गांधीजींच्या सत्याग्रहाचा वापर करून सविनय कायदेभंग चळवळ उभी केली आणि सरकारला शेतसारा माफ करायला भाग पाडले पुढे 1928 मध्ये बारडोली येथे शेतकऱ्यांना हैराण करणारा शेतसारा मोठ्या प्रमाणावर वाढविण्यात आला या परिस्थितीत शेतकऱ्यांच्या पाठीमागे बळीराजा शेतकरी पुत्र सरदार वल्लभभाई पटेल उभे राहिले सहा महिने अन्याय अत्याचार सहन केला परंतु चुकले नाही तत्व सोडले नाही आणि सरकारने जप्त केलेल्या जमिनी परत करायला भाग पाडले या त्यांच्या यशस्वी नेतृत्वाबद्दल महात्मा गांधीजींनी वल्लभभाई पटेल यांना सरदार ही पदवी दिली अशी माहिती सभागृहासमोर मांडली त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय डॉ. मोहनभाऊ फालक यांनी अध्यक्षीय समारोप केला त्यात त्यांनी उपस्थितांना राष्ट्रीय एकाता दिनाच्या आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देऊन भारताला स्वातंत्र्य जरी 1947 मध्ये मिळालेले असले तरी खऱ्या अर्थाने 47 नंतर संपूर्ण भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्याचे कार्य सरदार पटेल यांनी केलेले आहे असामान्य धैर्य, अपार सहनशक्ती, प्लेग दुष्काळ साथीचे आजार सक्तीचा सारा वसुली अशा लोक जीवनाशी निगडित प्रश्नांना वाचा फोडणारे सरदार पटेल होते अशी माहिती त्यांनी दिली कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संगणक विभागातील प्राध्यापक आणि एन.एस.एस., एन.सी.सी चे प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी सहकार्य केले यावेळी वेगवेगळ्या विभागातील प्राध्यापक विभाग प्रमुख आणि विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते



