वरणगावमध्ये रेशन दुकानांवर अद्यापपर्यंत साखरचे वाटप नाही : शिवसेना पदाधिकाऱ्यांनी विचारला जाब: तालुका पुरवठा अधिकाऱ्यांचे उडवाउडविचे उत्तरे

वरणगाव – वरणगाव शहरामध्ये शासनमान्य स्वस्त रेशन दुकानामध्ये भाऊबीज झाल्यानंतरही आद्यापपर्यंत किटमधील साखरेचे वाटप झालेले नाहीं. याबाबत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी सकाळी शहरातील सर्व दुकानामध्ये जाऊन साखर अद्यापपर्यंत का मिळत नाही याचा जाब संबधित दुकानदारांना विचारला असता त्यांनी तालुका पुरवठा अधिकाऱ्याकडे बोट दाखविले. पुरवठा अधिकारी अतुल नागरगोजे यांच्याशी संपर्क साधल्यानंतर त्यांनी उडवाउडवीचे उत्तरे दिली. या प्रकारामुळे संतप्त शिवसैनिकांनी साखर जोपर्यंत वाटप करणार नाही, तोपर्यंत या महिन्यातील मोफत धान्य वितरण होऊ देणार नसल्याचा इशारा शिवसेनेने दिला आहे.

शासनातर्फे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर गोरगरिबांना १०० रुपयात किलो चणाडाळ, एक किलो रवा, एक किलो साखर आणि पामतेलचे आनंद शिधा या किटच्या माध्यमातून वितरित करण्यात येणार होते. परंतु वरणगाव शहरातील गोरगरीब नागरिकांकडून प्रतेक दुकादाराने १०० रुपये घेतले. दिवाळी झाली भाऊबीज झाल्यानंतरही अद्यापपर्यंत साखर सोडून सर्व वस्तू दिल्या. मग साखरच का रेशन दुकानदार देत नाही? याबाबत शिवसेनेकडे काही नागरिकांनी ही बाब सांगितली. याचा जाब विचारण्यासांठी गुरूवारी शिवसेनेचे शहरप्रमुख संतोष माळी, अल्पसंख्याक जिल्हा उपसंटक सईद मुल्लाजी, माजी शहरप्रमुख गुणवंत भोई, शहर समन्वयक माजी ग्रा. प. सदस्य विलास वंजारी, माजी उपशहर प्रमुख सुनिल भोई, संघटक प्रल्हाद माळी, सुनील देवघाटोले, विभाग प्रमुख किरण माळी यांनी प्रत्येक रेशन दुकानावर जाऊन अद्यापपर्यंत साखर का मिळत नसल्याचा जाब विचारला. दुकानदारांनी तालुका पातळीवरूनच साखर आली नसल्याचे सांगितले.

  • तालुका पुरवठा अधिकारी नागरगोजे यांचे उडवाउडवीचे उत्तर

रेशन दुकानदार यांनी तालुका पातळीवरूनच आम्हाला साखर आली नसल्याचे सांगितले. याबाबत तालुका पुरवठा अधिकारी अतुल नागरगोजे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी उडवउडवीचे उत्तरे दिली.

  • साखर नाहीं तर धान्य वितरण होऊ देणार नाहीं

या महिन्यातील नागरिकांना रेशन धान्य वितरण करण्याच्या अगोदर साखरचे वाटप झाले पाहिजे. अन्यथा शिवसेनेतर्फे आंदोलन करून धान्य वितरण होऊ देणार नसल्याचा इशाराही शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी रेशन दुकानदारांना दिला आहे.