भुसावळ – शहरातील प्रभाग क्रमांक २२ मधील विकास कामे ही रखडलेली होती. यासंदर्भात माजी नगराध्यक्ष यांच्या मार्फत निवेदन सादर करण्यात आले. नगर परिषदेचे दुर्लक्षामुळे प्रभागातील नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले.अखेर रस्त्यांची प्रलंबित कामे मार्गी लागली असून माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे यांच्या प्रयत्नाला यश आले आहे.

भुसावळ नगरपरिषद यांच्या माध्यमातुन शहरातील अनेक प्रभागमध्ये विकास कामांचे मुहूर्त निघाले पण ती कामे मध्यांतरी सोडण्यात
आली आहे.मुक्तेदारांनी मात्र आपले बिले काढून मालामाल झाली आहे.ही मध्यांतरी सोडलेली कामे “जैसी थी वैसी”दिसत आहेत.असे कामा संदर्भात प्रभाग क्रमांक २२ मधील भिरूड हॉस्पीटल मागील भाग, सुरभि नगर, देना नगर कस्तुरी नगर ,सुराणा बिल्डिंग परिसर,मुक्तानंद कॉलनी,रघूकुल कॉलनी,नेब कॉलनीच्या पुर्वेकडील भाग आदी परिसरातील रस्त्यांची अतिशय दुर्दशा झालेली होती. नगरपरिषद मुख्याधिकारी यांच्याकडे रस्ते व्हावे यासाठी वारंवार निवेदने देण्यात आले होते.
सदर रस्ते,मरणयातना भोगत होते आणि नागरीकांना ये-जा करतांनाची कसरत करत विविध आजार जडत होते.नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत सदर रस्त्यांचा आयत्या वेळी विषय घेण्याची विनंती करण्यात आली होती,त्यानुसार बी,बी,एम झाले होतें,तसेच २० जुलै २०२२ रोजी नागरिकांना अडचणी संदर्भात पत्र दिले होते. पावसाळा संपताच सदर रस्त्यांची कामे,सातत्याने माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे यांनी केलेल्या मागणीची दखल प्रशासनाने घेऊन संबंधित रस्त्यांची कामे सुरु केल्याबद्दल परिसरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण दिसत आहे.


