भुसावळ (प्रतिनिधी )-
माजी राष्ट्रपती स्वर्गीय डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून भारतभर साजरा केला जातो. शिक्षक हा भावी पिढीचा शिल्पकार असून त्यांच्याकडूनच आपल्याला ज्ञान व जगाकडे पाहण्याची सकारात्मक दृष्टी मिळते, परंतु सध्याच्या कोरोना संक्रमण काळात शिक्षकांनी कसे निभावून घेतल हेसुद्धा महत्त्वाचे होते. शाळा बंद, तरी शिक्षण सुरू. विविध माध्यमातून, उपक्रमातून मुलांचे शिक्षण सुरू राहण्यासाठी प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नांना कमालीची साथ मिळाली ती तंत्रज्ञानाची असे मत श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम विभागाच्या वतिने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.पी.सिंह, डीन डॉ. राहुल बारजिभे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित शिक्षक दिनाच्या कार्यक्रमात प्रा.अनंत भिडे यांनी मांडले.

इलेक्ट्रॉनिक्स तंत्रज्ञानातून शिक्षकांना मिळाले बळ:
कोरोनाने सर्वांचीच परीक्षा घेतली. शिक्षकांच्या माध्यमातून जगाच्या कानाकोपऱ्यात ज्ञान पोहोचवणं आणि त्या ज्ञानाचा उपयोग करून विद्यार्थ्यांनी उत्क्रांत होणे सुद्धा अत्यंत आवश्यक असतं. सध्याच्या घडीला हे जर शक्य झाला ते इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांनी शिक्षकांना मदत केल्यामुळे झाल. येणाऱ्या काळात सुद्धा शिक्षक स्वतःला उत्क्रांत आणि अधिक अपडेट करून घेतील. या माध्यमांचा वापर करत एक सशक्त तंत्रस्नेही शिक्षक म्हणून स्वतःला प्रस्थापित करतील आणि ज्ञानाच कार्य सतत ठेवून जो शिक्षकांवरचा विश्वास आहे तो आधुनिक इलेक्ट्रॉनिक्स तंत्रज्ञानाचा वापर करून अधिक सुदृढ विश्वास निर्माण करतील असे प्रा. भिडे म्हणाले.
नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून स्वतःला सशक्त करा: प्रा.धिरज अग्रवाल
शिक्षक हा ज्ञानाचा ट्रान्समीटर व दूरसंवेदन तंत्रज्ञान घेऊन जाणाऱ्या ज्ञानवर्धक वाहिन्या आहेत. शिक्षकाने सतत स्वतःला अपडेट ठेवणे अत्यंत गरजेचे असते शिक्षकांनी या नव्या तंत्रज्ञानाचा वापर करत स्वतःला अधिक सशक्त करून घेणे अत्यावश्यक झालेला आहे आणि ज्ञानाच्या संक्रमण काळामध्ये सर्व शिक्षकांनी ज्ञान कानाकोपऱ्यात पोहोचवण्यात हे आवाहन इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांच्या माध्यमातून लीलया पेललं आहे. इलेक्ट्रॉनिक उपकरण आणि शिक्षक हे एकमेकांना पूरक ठरत ज्ञानाच्या क्षेत्रात एक प्रचंड मोठी क्रांती आणू पाहत आहे अशी माहिती प्रा.धिरज अग्रवाल यांनी दिली.
खडू-फडयाच्या बरोबरीनेच स्मार्ट बोर्ड: प्रा.धिरज पाटील
खडू-फडयाच्या बरोबरीनेच स्मार्ट बोर्ड, दूरसंवेदन यंत्रणा, इलेक्ट्रॉनिक्स गॅझेट ह्या नवसंकल्पना भारतातीलच नव्हे तर जगातील प्रत्येक कानाकोपऱ्यात ज्ञान पोहोचवण्यासाठी शिक्षक यांचा वापर करत अथक परिश्रम घेत आहेत. साधारण मागच्या शैक्षणिक वर्षी तीन महिन्यात आणि ह्या वर्षीच्या या कालखंडात विद्यार्थ्यांमध्ये खूप सकारात्मक बदल जाणवले आहे. त्यांनी नवीन तंत्रज्ञान त्यांनी इतक्या सहजतेने स्वीकारलं की भविष्यात थेट अध्यापनात त्यांना नक्की खूप फायदा होईल. पाश्चात्य देशांप्रमाणे यापुढेही इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांचा शिक्षण क्षेत्रात वापर नक्कीच वाढणार आहे . त्यामुळे शिक्षक नियमित शाळा सुरू झाल्यानंतर ही ऑनलाईनचा उपयोग करून शिकवतील आणि एकंदरीतच विद्यार्थ्यांच्या प्रगतीविषयी पालकांसोबत सुद्धा बोलता येईल असे मत प्रा.धिरज पाटील यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमात प्रा.अनंत भिडे, प्रा.धिरज अग्रवाल, प्रा.सुलभा शिंदे, प्रा.डॉ.नीता नेमाडे, प्रा.गजानन पाटील, प्रा.संतोष अग्रवाल, प्रा. स्मिता चौधरी, प्रा.धिरज पाटील, प्रा.निलेश निर्मल, प्रा.दीपक खडसे यांनी सहभाग नोंदवला.


