रेल्वे संरक्षा विभागातर्फे संरक्षित रेल्वे कार्यांसाठी स्टेशन मास्टर्स, लोको पायलट आणि गार्ड यांचे ऑनलाईन समुपदेशन ;

भुसावळ (प्रतिनिधी )-
मध्य रेल्वेचा संरक्षा विभाग लॉकडाऊन दरम्यान संरक्षित रेल्वे कार्यांसाठी स्टेशन मास्टर्स, लोको पायलट आणि गार्ड यांचे समुपदेशन ऑनलाईन करीत आहे .
मध्य रेल्वेचा संरक्षा विभाग श्रमिक स्पेशल ट्रेनच्या सुरक्षित दळणवळणासाठी कोरोनाव्हायरसशी अत्यंत शांत आणि प्रभावी मार्गाने लढत आहे. मध्य रेल्वेच्या विविध ठिकाणांहून प्रवास करणा-यांचा प्रवास आणि माल/पार्सल गाड्यांचे दळणवळण संरक्षा विभाग सुरक्षित सुनिश्चित करत आहे. दररोज, अनेक श्रमिक स्पेशल गाड्या मध्य रेल्वेच्या वेगवेगळ्या स्थानकांवरून वेगवेगळ्या ठिकाणी जातात. तसेच भारतीय रेल्वेमार्गावर भाजीपाला, धान्य, औषध, कोळसा, पेट्रोल, डिझेल, रॉकेल आणि दुधासारख्या जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी व इतर आवश्यक /आपत्कालीन सेवांसाठी अनेक मालगाड्या आणि पार्सल गाड्या चालवण्यात येत आहेत.
या गाड्यांच्या परिचालन सुरक्षेसाठी मध्य रेल्वेचा संरक्षा विभाग अत्यंत महत्वाची आणि अत्यावश्यक भूमिका बजावते. रेल्वे संचालनामधील विलक्षण विश्लेषण करणारे आणि सुधारात्मक कारवाई करण्याच्या कमतरता ठळक करणारा एक बहु-शिस्त विभाग आहे. लॉकडाउन कालावधी दरम्यान संरक्षा अधिकारी कर्मचार्‍यांना सतत सल्ला देत आहेत आणि असुरक्षित काम करण्यापासून प्रतिबंध करत आहेत. संरक्षा अधिकारी वेळोवेळीच्या सूचनांशिवाय सामान्य स्वच्छता आणि हॅड सॅनिटायझरचा वापर, मुखपट्टी (मास्क), सामाजिक अंतर यावर देखील सतर्कतेने लक्ष ठेवतात. भारतात सुरक्षितपणे गाड्या चालवण्याकरिता, कर्मचार्‍यांच्या सुरक्षित कामाचे समुपदेशन व अद्ययावत करणे ही एक सतत प्रक्रिया आहे.
लॉकडाऊन दरम्यान, सामाजिक अंतर राखण्यासाठी जन समुपदेशनाची मर्यादा पार करत संरक्षा विभागाने रेल्वेच्या सुरक्षित संचालनाबाबत कर्मचार्‍यांना संवेदनशील आणि अद्ययावत करण्यासाठी क्रिएटिव्ह मॉड्यूलद्वारे डिजिटल ऑनलाइन समुपदेशनाची नवीन कल्पना आणली आहे.
मध्य रेल्वे संरक्षा अधिकारी / समुपदेशक ’कोविड -१९ च्या लॉकडाऊन कालावधीत भुसावळ, मुंबई, पुणे, नागपूर आणि सोलापूर या सर्व विभागांमध्ये अत्यंत समर्पणाने काम करत आहेत. प्रतिकूल परीस्थितीतील असाच एक मूक योद्धा. विजय काशिनाथ मोरे, समर्पित सेफ्टी काउन्सलर (ट्रॅफिक), भुसावळ विभागामध्ये कार्यरत आहे, सुरक्षित ट्रेनचे कामकाज सुनिश्चित करण्यासाठी त्यांनी कर्तव्य व समर्पणाची पराकाष्ठा केली आहे. श्री. मोरे यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करीत फक्त भुसावळ विभागातीलच नव्हे तर संपूर्ण मध्य रेल्वेच्या स्टेशन मास्टर, लोको पायलट, गार्ड सारख्या कर्मचार्‍यांना ई-कौन्सिलींग केले आहे. ट्रॅफिक मुव्हमेंट करताना स्टेशन मास्टर्सने घ्यावयाची खबरदारी, ट्रेनचे भाग करणे आणि विभाजन, जेव्हा सर्व संप्रेषण अपयशी ठरते, ट्रेन ग्रेडियंट वर थांबते तेव्हा करावयाची कारवाई, शंटिंग नियम, सिग्नल दोष, वेगवेगळ्या ट्रेन वर्किंग ऑथॉरिटीज, वेगवेगळे इंजिन व्हिसल कोड, पॅनेल ऑपरेशन आणि अपघाताच्या बाबतीत लोको पायलट, स्टेशन मास्टर, गार्ड, सेक्शन कंट्रोलरचे कर्तव्य यासारख्या विषयांवर मोरे यांनी तयार केलेल्या ‘संरक्षण प्रवचन’ या डिजिटल सादरीकरणात सामान्यपणे बोलले जाणारे आणि सहज समजण्यासारखे हिंदी शब्द आहेत.
मुख्य सुरक्षा अधिकारी प्रकाश भूटानी आणि विवेक कुमार गुप्ता, मंडल रेल प्रबंधक भुसावळ यांनी मोरे यांना ट्रेनच्या कामकाजाच्या सुरक्षाविषयक विविध पैलूंवर असे अभिनव आणि रुचिपूर्ण ‘‘ संरक्षण प्रवचन” तयार करण्यासाठी प्रेरित केले. त्यांनी कर्मचार्‍यांचे ज्ञान वाढविण्यासाठी सेफ्टी क्विझही तयार केले. ई-मॉड्यूलच्या संपूर्ण तयारी दरम्यान त्यांना के. पी. कृष्णन, उपमुख्य संरक्षा अधिकारी, मध्य रेल्वे यांचे मार्गदर्शन लाभले.
विजय मोरे यांनी तयार केलेला हा ई-समुपदेशन प्रयत्न महान प्रेरणादायी असल्याचे सिद्ध झाले आहे आणि रेल्वे प्रवाशांच्या आणि मालाच्या सुरक्षिततेच्या पैलू सुनिश्चित करण्यासाठी कर्मचार्‍यांना त्यांचे ज्ञान अद्ययावत करण्यास मदत करणारे ठरले आहे. ‘संरक्षा प्रवचन’ चे निर्माते विजय मोरे हे कोविड -१९ च्या विरोधातील लढाईतील योद्धांपैकी एक आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *