रावेर –
देशातच नव्हे तर संपूर्ण जगात कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावामुळे भीषण परिस्थिती ओढवली आहे , अश्या गंभीर परिस्थितीत सलोख्याचे भावनेतून रहावे , एकता दाखवून बंधुता टिकवण्या ऐवजी कसल्या दंगली घडवून आणत आहे लाज वाटायला पाहिजे.अशी खंत व्यक्त करीत खणखणित खड़े बोल पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सुनावले.तसेच पोलिस प्रशासनास सहकार्य करा , कुणीही घरा बाहेर निघू नका , असे आवाहन केरीत दंगलीत नुकसान झालेल्यांना भरपाई मिळावी म्हणून प्रयत्न करेल असे तुर्तास आश्वासन जिल्हयाचे पालकमंत्री ना गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केले .
यावेळी त्यांचे सोबत आ शिरीष दादा चौधरी,आ चंद्रकांत पाटील, माजी जि . प .उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, केळी उत्पादक संघाचे भागवत पाटील, डी के पाटील, युवराज पाटील, सोपान पाटील सेना उपजिल्हा प्रमुख प्रल्हाद महाजन,माजी नगराध्यक्ष रमेश महाजन, किशोर पाटील, राजू सवरणे, बाळू शिरतुरे, आसिफ मोहम्मद, शे गयास आदी मान्यवर उपस्थित होते. जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ पंजाबराव उगले, प्रांताधिकारी डॉ अजित थोरबोले, तहसीलदार अभिलाषा देवगुणे पो नि रामदास वाकोडे आदीं उपस्थित होते . यावेळी दंगली बाबत अधिकारी यांचे कडून आढावा जाणून घेतला. दरम्यान शेतकऱ्यांनी आपला शेतीतील केळी काढणी आणि विक्रीची परवानगी मिळावी म्हणून प्रशासनाला विनंती केली . पोलीस अधीक्षक डॉ उगले यांनी कोरोनाच्या लागण होणार नाही याची काळजी घेणे हे सर्वांचे आद्य कर्तव्य असून स्वत: बरोबरच इतरांची काळजी घ्या असे आवाहन केले .
रावेर येथील दंगलग्रस्त भागास पालकमंत्री ना गुलाबराव पाटील यांची भेट; नागरिकांना केले शांततेचे आवाहन

