भुसावळ संविधान बचाओ समीतीचे धरणे आंदोलन तात्‍पुरते स्थगित.

भुसावळ (प्रतिनिधी )-
-येथे संविधान बचाओ समितीे तर्फे सीएए,एनपीआर व एनआरसीच्या विरोधात मागील ५० दिवसांपासून तहसील कार्यालयासमोर सुरु असलेल्या साखळी उपोषण,धरणे आंदोलनास
काही तांत्रिक कारणामुळे तहसिलदार दिपक धिवरे यांना निवेदन देऊन आंदोलनाला तात्‍पुरते स्थगित करण्यात आले आहे.
पुढील दिशा,विचार विमर्श व न्यायालयीन निर्णया नंतर आंदोलनाबाबत निर्णय घेण्यात येईल.या धरणे आंदोलनात भुसावळ शहरातील सर्व धर्मिय बांधवांनी या आंदोलनाला पाठींबा देऊन तसेच पोलीस प्रशासन,महसुल विभाग,मिडीयाने सहकार्य केल्याबद्दल संविधान बचाओ समीतीने आभार मानले आहे.या आंदोलनाच्या ५० व्‍या दिवशी संविधान बचाओ समितीचे अध्यक्ष सलीमसेठ चुडीवाले, साबीर शेख,मो.मुनव्वर खान, नगरसेवक सलीम पिंजारी,युनुस मामा,दानीश पटेल, ईमरान खान, डॉ ईमरान,अजहर शेख,मजहर शेख,अशरफ कुरेशी,जुनेद खान, मो.रईस,रऊफ ठेकेदार,अकबर सर,ईब्राहीम खान,आबीद भाई, शैलेन्द्र ननवरे, साबीर शेख,तौसीफ कुरेशी वासीफ यांच्‍यासह अनेक मान्यवर, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *