भुसावळ (प्रतिनिधी ) –
गेल्या तीन दिवसापासून शैक्षणिक मंथन 2020 वेबिनार चे आयोजन जिल्हा जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था जळगाव, जळगाव जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळ, नॅशनल कौन्सिल सायंटिस्ट, भारत. यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते यासाठी देशभरातून विविध तज्ञांना आमंत्रित करून वरणगाव येथून ऑनलाइन फेसबुक वर प्रसारित करण्यात आले.
या कार्यक्रमाला विज्ञान प्रसार भारत सरकारचे वैज्ञानिक अरविंद रानडे, सौराष्ट्र विश्वविद्यालयाचे कुलपती डॉ. नितीन पेथानी, जिज्ञासा ट्रस्ट, ठाणे चे संस्थापक अध्यक्ष सुरेंद्र दिघे, महाराष्ट्र राज्य विज्ञान अध्यापक महामंडळाचे अध्यक्ष दत्ता आरोटे, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. मंजुषा क्षीरसागर, अधिव्याख्याता डॉ. राजेंद्र महाजन आदी उपस्थित होते
यावेळी कोरोना गंभीर शिक्षण खंबीर या विषयावर बोलताना सुरेंद्र दिघे म्हणाले की कोरोनाविषाणू च्या प्रादुर्भावामुळे तंत्रज्ञानाचा वापर शिक्षणात नक्कीच केला पाहिजे परंतु यामुळे शिक्षणामध्ये असमानता निर्माण होईल समाजातील तळागाळापर्यंत शिक्षण पोहोचणार नाही यामुळे आता परंपरेनुसार सुरू असलेले शिक्षण पद्धतीचा पुनर्विचार करण्याची गरज आहे आरटीई ऍक्ट नुसार गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे महत्त्वाचे आहे परंतु यातील गुणवत्तापूर्ण शब्द हा कधीच निघून गेलेला आहे यामुळे खाजगी संस्था आल्यात खासगी संस्थेमुळे सुविधा व तंत्रज्ञान आले परंतु शिक्षण समानतेचा प्रश्न अनुत्तीर्ण राहिला आहे आता सध्या ऑनलाईन शिक्षण पद्धती समोर येऊ बघत आहे परंतु यामुळे देखील पालकांचा सहभाग देखील महत्त्व असून पालकांनी देखील मुलांवरती मूल्यशिक्षण धडे देऊन मुलांच्या पाठीमागे खंबीर उभी राहणे गरजेचे असल्याचे सांगत पालकांची भूमिकादेखील महत्त्वाची असल्याचे ते म्हणाले.
सौराष्ट्र विश्वविद्यालयाचे कुलपती डॉक्टर पेथानी विद्यार्थी मनोविज्ञान व शिक्षक या विषयावर बोलताना शिक्षणामध्ये मुलाचा सर्वांगीण विकास होणे अपेक्षित आहे आणि यामध्ये शिक्षकाची देखील सर्वसमावेशक भूमिका असली पाहिजे विद्यार्थ्यांचा सर्वसमावेशक विकास होणे तसेच राष्ट्रनिर्माण यासाठी त्याचा उपयोग करून घेणे व विद्यार्थ्यांची मानसिकता ओळखून त्यांच्यावरती शिक्षणाचे धडे गिरवले पाहिजे यामुळे आपल्याला भविष्यातील आदर्श पिढी घडवता येऊ शकते यासाठी शिक्षक व विद्यार्थी यांच्यामध्ये घट्ट नाते निर्माण होणे गरजेचे आहे
विज्ञान प्रसार चे शास्त्रज्ञ अरविंद रानडे वैज्ञानिक संकल्पना निर्मिती शिक्षकाची भूमिका या विषयावर बोलताना म्हणाले की पहिले गुरू आई वडील असतात नंतर शिक्षक हे पुढील जीवनाचे गुरु ठरतात यामुळे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण केला पाहिजे आपल्या घटनेत देखील वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी कलम आहे अभ्यासाव्यतिरिक्त मन न लागणाऱ्या विद्यार्थ्यांन वर लक्ष केंद्रित केले पाहिजे त्यांच्यातील आवड-निवड जाणून घेतल्या पाहिजे व त्यानुसार त्यांना शिक्षण दिले पाहिजे यामुळे निश्चितपणे चांगल्या कौशल्य विकासाचे धडे गिरवून ते भारताचे सक्षम नागरिक घडू शकतात पुढच्या पिढीने त्यांच्यावर जबाबदारी न लादता त्यांनी आनंदाने स्वीकारण्याची गरज आहे
महाराष्ट्र राज्य विज्ञान अध्यापक महामंडळाचे राज्याध्यक्ष दत्ता आरोटे म्हणाले की विद्यार्थ्यांना विचार करायला लावणारी त्यांची आवड निवड समजून घेणारे शिक्षण पद्धती असली पाहिजे विद्यार्थ्यांना वेळेचे नियोजन करण्याचे महत्त्व समजले पाहिजे कोणत्याही गोष्टी मागे काय कारण आहे ही शोधण्याची जिज्ञासा त्यांच्यात निर्माण झाली पाहिजे यासाठी विद्यार्थ्यांवर ती शाळे सोबतच पालकांनीदेखील लक्ष देण्याची गरज आहे
डॉ. मंजुषा क्षीरसागर म्हणाल्या की शाळा बंद असल्या तरी शिक्षण सुरू आहे या उपक्रमांतर्गत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचून त्यांच्यातील अभ्यासात सातत्य ठेवले जात आहे त्याचप्रमाणे शिक्षकांचे प्रबोधन व्हावे यासाठी विविध वेबिनार व कार्यक्रमांचे आयोजन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या वतीने केले जात आहे
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संदीप पाटील यांनी तर सूत्रसंचालन बी बी जोगे आभार किशोर राजे यांनी मानले



